महाराष्ट्राचा सुपुत्र पांडुरंग गावडे काश्मिरात शहीद

By admin | Published: May 22, 2016 08:27 PM2016-05-22T20:27:47+5:302016-05-22T20:27:47+5:30

दहशतवाद्यांशी उडालेल्या भीषण चकमकीत गंभीर जखमी झालेले नायक पांडुरंग महादेव गावडे यांचे रविवारी उपचारादरम्यान निधन झाले.

Maharashtra's son Pandurang Gawade martyr in Kashmir | महाराष्ट्राचा सुपुत्र पांडुरंग गावडे काश्मिरात शहीद

महाराष्ट्राचा सुपुत्र पांडुरंग गावडे काश्मिरात शहीद

Next

ऑनलाइन लोकमत

जम्मू-काश्मीर, दि. 22- कुपवाडा जिल्ह्यातील चक द्रुगमुल्ला येथे शनिवारी दहशतवाद्यांशी उडालेल्या भीषण चकमकीत गंभीर जखमी झालेले नायक पांडुरंग महादेव गावडे यांचे रविवारी उपचारादरम्यान निधन झाले. संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील सुपुत्र असलेले पांडुरंग गावडे यांना श्रीनगर येथील लष्कराच्या ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कुपवाडा जिल्ह्यातील चक द्रुगमुल्ला भागात शनिवारी दहशतवाद्यांसोबत भीषण चकमक उडाली होती. तब्बल नऊ तासपर्यंत चाललेल्या या चकमकीत भारतीय जवानांनी त्या भागात दडून बसलेल्या सर्व पाचही दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. परंतु या दरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ४१ राष्ट्रीय रायफल्सचे जवान पांडुरंग गावडे आणि ४७ रायफल्सचे जवान अतुल कुमार हे दोघे जखमी झाले.
पांडुरंग यांच्या चेहऱ्यावर तर अतुलकुमार यांच्या खांद्याला गोळी लागली होती. पांडुरंग गावडे हे पाच वर्षांपूर्वी लष्करात दाखल झाले होते. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थीत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील त्यांच्या आंबोली या मूळ गावी पाठविण्यात येणार आहे. शहीद पांडुरंग यांच्या मागे आई-वडील, पत्नी व दोन मुलगे आहेत.

Web Title: Maharashtra's son Pandurang Gawade martyr in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.