महाराष्ट्राच्या तिघांना सुवर्ण

By Admin | Published: June 29, 2017 03:42 AM2017-06-29T03:42:36+5:302017-06-29T03:42:36+5:30

भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे आयोजित ३४व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत

Maharashtra's three golds | महाराष्ट्राच्या तिघांना सुवर्ण

महाराष्ट्राच्या तिघांना सुवर्ण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे आयोजित ३४व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या उत्कर्ष गोर, संजिती सहा, वेदिका अमीन यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर बुधवारपासून ही स्पर्धा सुरू झाली. ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये मुलांच्या गटात उत्कर्षने ३४.३० सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. उत्कर्ष हा दिल्ली पब्लिक स्कुलमध्ये पाचवीत शिकत असून हार्मनी क्लब येथे नरेंद्र आचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये वेदीकाने ३६.४९ सेकंद वेळेसह बाजी मारली. कर्नाटकच्या समारा चाको व महाराष्ट्राच्या अपेक्षा यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले. मुलींच्या गटात १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात संजितीने १ मिनिट ०७.७७ सेकंद वेळ देत अव्वल स्थान पटकावले. महाराष्ट्राचीच पलक धामी (१.८.८२) रौप्यपदकाची मानकरी ठरली.
२०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या गटात तामिळनाडूच्या शक्ती बी हिने २ मिनिटे १९.१५ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या आन्या वालाने २.२०.८८ मिनिटे तर महाराष्ट्राच्याच अपेक्षा एफ हीने २.२१.५४ मिनिटांसह अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
४५० मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या संजिती सहा, अपेक्षा फर्नांडीस, पलक धामी, वेदिक अमिन या संघाने १.५९.४० सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले तर मुलांच्या गटात उत्कर्ष गोर, आरमान जेठा, विवान ठाकूर, रिषभ दास या महाराष्ट्राच्या संघा २.०९.५५ सेकंद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली.
स्पर्धेचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वीमिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव कमलेश नानावटी, महाराष्ट्र राज्य अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक असोसिएशनचे सचिव जुबिम अमेरिया, अध्यक्ष अभय दाढे, भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष विरेंद्र नानावटी, महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे उपस्थित होते.
निकाल : (प्रथम, द्वितीय व तृतीय या क्रमानुसार)
५० मीटर बॅकस्ट्रोक : ९ ते १० वर्षे मुले : उत्कर्ष गोर (महाराष्ट्र, ३४.३० सेकंद), एस. अथुबा (मणिपुर, ३६.०६), रिषभ दास (महाराष्ट्र, ३६.१९). मुली : रिदिमा कुमार (कर्नााटक, ३५.५१ सेकंद), जहानबी कश्यप (आसाम, ३७.०४), आश्ना एएम (कर्नाटक, ३७.४३)
५० मीटर फ्रीस्टाईल : ९ ते १० वर्षे मुले : उत्कर्ष गोर (महाराष्ट्र, ३०.५५ सेकंद), अहमद बसीत (आसाम, ३१.४०), एस. अथुबा (मणिपुर ३२.३०). मुली : जाहानबी कश्यप (आसाम, ३०.८८ सेकंद), रिदिमा कुमार (कर्नाटक, ३०.९१), हसिनी पी. (तमिळनाडू, ३२.६५)
५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक : ९ ते १० वर्षे मुले : सुराबीन रियान (त्रिपुरा, ३५.०६ सेकंद), सुरज चौहान (उत्तर प्रदेश, ३५.६८), रेहान मिर्झा (आसाम, ३६.५७) व जशुआ थॉमस (तमिळनाडू, ३६.५७). मुली : वेदीका अमिन (महाराष्ट्र, ३६.४९ सेकंद), समारा चाको (कर्नाटक, ३६.९८), अपेक्षा एफ. (महाराष्ट्र, ३७.८५).
१०० मीटर बटरफ्लाय : ११ ते १२ वर्षे मुले : सोहन गांगुली (गोवा, १ मिनिट २.७५ सेकंद), अनुभव पराशर (आसाम, १.३.६३), साहिल लष्कर (पश्चिम बंगाल, १.३.८४). मुली : संजिती शहा (महाराष्ट्र, १.७.७७), पलक धामी (महाराष्ट्र, १.८.८२), शक्ती बी. (तामिळनाडू, १.१२.४६).
२०० मीटर फ्रीस्टाईल : ११ ते १२ वर्षे मुले : सोहन गांगुली (गोवा, २ मिनिटे ८.४८ सेकंद), मयंक सोलंकी (दिल्ली, २.१५.८१), कृष्णा पी. (तामिळनाडू, २.१८.१९). मुली : शक्ती बी. (तामिळनाडू, २ मिनिटे १९.१५ सेकंद), आन्या वाला (महाराष्ट्र, २.२०.८८), अपेक्षा एफ. (महाराष्ट्र, २.२१.५४).
४ बाय ५० मीटर फ्रीस्टाईल रिले : ९ ते १० वर्षे मुले : उत्कर्ष गोर, आरमान जेठा, विवान ठाकूर, रिषभ दास (महाराष्ट्र, २ मिनिटे ९.५५ सेकंद), संस्कार भुयान, भुप्रती बुजोर्इंग, बसित अहमद, अंशुमन कश्यप (आसाम, २.१०.०१), सक्षम पन्वर, रॉबीन सेन, रणबीरसिंग, भाग्य गहलोत (दिल्ली, २.१४.२३). ४ बाय ५० मीटर फ्रीस्टाईल रिले : ११ ते १२ वर्षे मुली : संजिती सहा, अपेक्षा फर्नांडीस, पलक धामी, वेदिक अमिन (महाराष्ट्र, १ मिनिट ५९.४० सेकंद), संहिता आर, जेदिया ए, लतीशा मंदना, निना व्यंकटेश (कर्नाटक, २.२.५२), आस्था बोदोर्लोई, लवलीन दास, मनाली मिश्रा, अश्रीता गोस्वामी (आसाम, २.५.३०)

Web Title: Maharashtra's three golds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.