महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे कॅमेऱ्यात करा बंदिस्त !

By admin | Published: December 5, 2015 09:09 AM2015-12-05T09:09:21+5:302015-12-05T09:09:21+5:30

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (पीआयएफएफ) एमटीडीसी- शॉर्ट फिल्म स्पर्धा पीआयएफएफ २०१६ ची घोषणा केली.

Maharashtra's tourist places to be locked in the camera! | महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे कॅमेऱ्यात करा बंदिस्त !

महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे कॅमेऱ्यात करा बंदिस्त !

Next

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (पीआयएफएफ) एमटीडीसी- शॉर्ट फिल्म स्पर्धा पीआयएफएफ २०१६ ची घोषणा केली. हा फेस्टिव्हल १४ ते २१ जानेवारी २०१५ दरम्यान संपन्न होणार आहे. ही स्पर्धा शॉर्ट फिल्म मेकिंग आणि व्हीडीओग्राफी नवोदितांकरिता आहे. आकर्षक बक्षिसे मिळविण्याची संधी देखील मिळणार आहे.
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना सिनेमॅटीक पद्धतीन चित्रीत करणाऱ्या सर्वोत्तम फिल्मला पुणे इंटरनशनल फिल्म फेस्टिव्हलच्या एमटीडीसी-एसएफसी विभागात सादर करण्यात येईल. या फिल्म्स मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये चित्रीत करता येईल.
कोकण-समुद्र आणि स्कुबा डायव्हिंग, वन्यजीवन- ताडोबा आणि औरंगाबाद तसेच बिवी का मकबरा या पर्यटन स्थळांवर स्पर्धकांनी फिल्म बनवावी अशी अपेक्षा आहे. प्रत्येक वर्गवारीत दोन विजेते बक्षीसपात्र ठरतील. पहिल्या क्रमांकाला १.२५ लाख रुपये तर दुसऱ्या क्रमांकाला ७५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. या शॉर्ट फिल्म्सची निवड समितीद्वारे करण्यात येईल. पीआयएफएफमध्ये स्क्रीनिंग झाल्यानंतर अंतिम निवड फेरी पार पडेल. या विषयीची अधिक माहितीwww.piffindia.com आणि http://www.maharashtratourism.gov.in/वर देखील उपलब्ध आहे.

माध्यमांचा प्रभावी वापर
एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानुटीया (आयएएस) म्हणाले की, ‘डिजीटल युग वाढते आहे. डिजीटल मार्केटींगच्या युगात काही सेकंदांचा व्हीडीओ हजारो शब्द व्यक्त करते. महाराष्ट्राचा प्रसार करण्याकरिता नवा मीडिया प्लटफॉर्म वापरण्याचे आमचे लक्ष्य आहे. महाराष्ट्राची ओळख दृश्यात्मक आणि ध्वनी माध्यमातून कल्पक पद्धतीने प्रस्तुत करण्याचे आव्हान आहे. यावर्षी देखील गेल्या वर्षीप्रमाणे भरभरून प्रतिसादाची अपेक्षा आहे.’

Web Title: Maharashtra's tourist places to be locked in the camera!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.