राजपथावर महाराष्ट्राची ‘वारी’
By Admin | Published: January 23, 2015 01:21 AM2015-01-23T01:21:29+5:302015-01-23T01:21:29+5:30
महाराष्ट्राचा ‘पंढरीची वारी’या संकल्पनेवरील चित्ररथ यंदाच्या राजपथावरील प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे.
दिल्लीत घडणार दर्शन : १५ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २५ चित्ररथ
नवी दिल्ली : महाराष्ट्राचा ‘पंढरीची वारी’या संकल्पनेवरील चित्ररथ यंदाच्या राजपथावरील प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. सहभागी होणाऱ्या कलाकारांनी सराव केला असून, चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रासह १५ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २५ चित्ररथ सहभागी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
प्रजासत्ताक दिली राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्र मात देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. ‘पंढरीची वारी’ या चित्ररथाच्या माध्यमातून देशवासियांना महाराष्ट्राचे दैवत व तमाम वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगांच्या भेटीला राज्यातील व राज्याबाहेरील विविध भागातून पायी येणारे वारकरी आणि त्यातून होणारे सामाजिक व सांस्कृतिक दर्शन होणार आहे. चित्ररथाचे संकल्पनाचित्र कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांचे असून, एकूण ६५ कारागिरांनीत्याची निर्मिती केली आहे. चित्ररथाच्या प्रारंभी डोक्यावर तुळस घेतलेली स्त्री असून, मध्यभागी पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. अश्वांचे रिंगण चित्ररथावर असून, शेवटच्या भागात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज महाराजांच्या मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. (विशेष प्रतिनिधी)
च्या चित्ररथावर विठ्ठल विठ्ठल तुला साद आली तुझ्या लेकारांची अलंकापुरी आज भारवली, वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली’ यागीतावर टाळ, मृंदग, वीणेच्या गजरात वारकरीवातावरण भारावून टाकणार आहेत.
च्चित्ररथाच्या दोन्ही बाजूला पालखी, पतका, टाळ, मृदंग, वीणेसह वारीत सहभागी १३० वारकऱ्यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत.