महाराष्ट्राच्या विवेक भाटियांची आॅस्ट्रेलियात भरारी; १४ बिलियन डॉलर्सच्या विमा कंपनीचे प्रमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:38 AM2018-01-11T06:38:29+5:302018-01-11T06:38:52+5:30
येथील विवेक भाटिया आॅस्ट्रेलियाच्या १४ बिलियन अमेरिकी डॉलर्सची विमा कंपनी ‘क्यूबीई’मध्ये आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडचे ‘बिझनेस आॅपरेशन्स’चे प्रमुख झाले आहेत. त्यांच्या या नियुक्तीने औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
औरंगाबाद : येथील विवेक भाटिया आॅस्ट्रेलियाच्या १४ बिलियन अमेरिकी डॉलर्सची विमा कंपनी ‘क्यूबीई’मध्ये आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडचे ‘बिझनेस आॅपरेशन्स’चे प्रमुख झाले आहेत. त्यांच्या या नियुक्तीने औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
भाटिया यांनी २०१७ चा ‘इन्शुरन्स लीडर आॅफ द ईअर’ पुरस्कार पटकावला. आॅस्ट्रेलियाच्या विमा क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे. यापूर्वी ते न्यू साउथ वेल्स सरकारच्या ‘इन्शुरन्स व केअर स्कीम’चे मॅनेजर होते. ते पेट रेगन यांची जागा घेतील. त्यांचा ‘आयकेअर’ कंपनीच्या स्थापनेत सिंहाचा वाटा होता. भाटिया यांची तेव्हा ‘चिफ एक्झिक्युटिव्ह आॅफिसर व मॅनेजिंग डायरेक्टर’पदी नियुक्ती करण्यात आली होती.
हे माझे भाग्य
क्यूबीईचे नेतृत्व करण्यास मिळणे, हे माझे भाग्य आहे. मी येथेच १५ वर्षांपूर्वी विमा क्षेत्रातील वाटचाल सुरू केली होती, असे भाटिया म्हणाले.
लोकमत समूहाने आयोजित केलेल्या ‘पहनावा’ स्पर्धेमध्ये
त्यांनी यश मिळविले होते.