आज रंगणार महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2017 04:55 AM2017-04-11T04:55:19+5:302017-04-11T04:55:19+5:30

सोशल मीडियामधली जगातली अग्रेसर कंपनी फेसबुक आणि महाराष्ट्रातील अग्रणी वृत्तपत्र समूह ‘लोकमत’ एकत्र येताहेत, राज्यातील प्रत्येक युवकाशी जोडले जाण्यासाठी.

Maharashtrian's The Year Award Ceremony to be held here today | आज रंगणार महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळा

आज रंगणार महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळा

Next

मुंबई : सोशल मीडियामधली जगातली अग्रेसर कंपनी फेसबुक आणि महाराष्ट्रातील अग्रणी वृत्तपत्र समूह ‘लोकमत’ एकत्र येताहेत, राज्यातील प्रत्येक युवकाशी जोडले जाण्यासाठी. लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर हा पुरस्कार सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्रातील जनता आतुर आहे. मुंबईमध्ये रंगणाऱ्या या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण फेसबुकच्या साथीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

फेसबुक व लोकमत एकत्र येणं म्हणजे वाचकांसाठी पर्वणी
डिजिटल व सोशल मीडियाच्या वापरामध्ये तरुण पिढी आघाडीवर आहे. या माध्यमांचा कॉम्प्युटर व मोबाइलच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्यांमध्ये तब्बल ८० टक्के वाटा हा तरुणांचा आहे.

हा युवा वाचक प्रत्येक क्षणाला ताज्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतो. हीच गरज ओळखून फेसबुक व लोकमत एकत्र आले आहेत, वाचकांना महाराष्ट्रीयन आॅफ द इयर हा पुरस्कार सोहळा लाइव्ह दाखवण्यासाठी... हा पुरस्कार सोहळा असणार आहे सत्ता, कर्तृत्व आणि ग्लॅमरचा त्रिवेणी संगम.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखती घेणार आहेत प्रफुल पटेल आणि रामदास आठवले. रणबीर कपूर व आलिया भट हेही प्रथमच रंगमंचावर एकत्र येत आहेत आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत ऋषी दर्डा.

यूपीएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.

कधी?
हा सोहळा मंगळवार, दि. ११ एप्रिल रोजी संध्याकाळी
६ वाजल्यापासून मुंबईत रंगणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी फेसबुकवर लॉग आॅन करा.

थेट पाहा फेसबुकवर...
facebook.com/lokmat

Web Title: Maharashtrian's The Year Award Ceremony to be held here today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.