कोल्हापुरात महारॅलीने सर्वपक्षीय निषेध
By admin | Published: September 11, 2015 03:06 AM2015-09-11T03:06:35+5:302015-09-11T03:06:35+5:30
कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय
कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शहरातून दुचाकींची महारॅली काढण्यात आली. तसेच ‘कोल्हापूर बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
माजी महापौर आर.के. पोवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून महारॅलीला प्रारंभ झाला. न्या. मोहित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यात वकिलांसह सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि विधी महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तर, प्रमुख व्यापारी पेठेतील दुकाने, काही शाळा विद्यार्थी वाहतूक संघटनांनी ‘कोल्हापूर बंद’ला पाठिंबा दिला.
मनपा सभा तहकूब ठेवून निषेध
सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू करण्याचा निर्णय घेऊ, अशी ग्वाही देऊनही ती न पाळणाऱ्या माजी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत गुरुवारी महानगरपलिका सर्वसाधारण सभा तहकूब ठेवण्यात आली.