"महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’चा नारा दिला आता ‘छोडो भाजपा’ चा नारा देण्याची गरज’’, शरद पवार यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 10:30 PM2024-03-17T22:30:57+5:302024-03-17T22:31:23+5:30
Sharad Pawar News: स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांनी मुंबईतून ब्रिटिशांविरोधात भारत छोडो चा नारा दिला होता. आता भाजप छोडो नारा देण्याची आवश्यकता असल्याचं आवाहन केलं.
आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोप सभेत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमधील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. या नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाच्या हुकूमशाही प्रवृत्तीवर घणाघाती टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांविरोधात भारत छोडो चा नारा दिला होता. आता भाजप छोडो नारा देण्याची आवश्यकता असल्याचं आवाहन केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आज ज्यांच्या लोकांच्या हातात सत्ता आहे त्यांनी महिला, शेतकरी, कामगार, आदिवासी, दलितांनी जे आश्वासन दिली होती ती पूर्ण केली नाहीत. आश्वासन देऊन जनतेला फसवले त्यांना हटवण्याची गरज आहे. मोदींची गॅरंटी खोटी आहे, ती चालणार नाही. मुंबईतूनच महात्मा गांधी यांनी छोडो भारतचा नारा दिला होता आज छोडो भाजपा हा नारा दिला पाहिजे.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Speaking at the Congress leader Rahul Gandhi's 'Bharat Jodo Nyay Yatra', NCP-SCP chief Sharad Pawar says, "Mahatma Gandhi gave 'Quit India' slogan from this city, today we (INDIA alliance) should vow to oust BJP from power..." pic.twitter.com/nxWZ6a9PDX
— ANI (@ANI) March 17, 2024
यावेळी नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवरही शरद पवार यांनी टीका केली. शरद पवार म्हणाले की, देशातील परिस्थितीत बदल घडवून आणण्याची गरज आहे. मोदींच्या गॅरंटीबाबत मागच्या दिवसांपासून सातत्यानं ऐकावं लागत होतं. मात्र हे आजपासून ऐकावं लागणार नाही. त्यासाठी निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजेत. आता मोदींची गॅरंटी चालणार नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.