संघाला महात्मा गांधी वंदनीय!
By admin | Published: November 16, 2015 03:09 AM2015-11-16T03:09:45+5:302015-11-16T03:09:45+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला फाशी दिली तो दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा करणाऱ्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाचार घेतला
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला फाशी दिली तो दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा करणाऱ्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाचार घेतला. संघ महात्मा गांधींचा सन्मान करतो आणि त्यांची हत्या करणाऱ्याचा उदो उदो अयोग्य असल्याचे मत संघ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
देशभरात नथुराम गोडसे यांचे विविध संस्थांकडून उदात्तीकरण सुरू आहे. त्यावर संघ विचारकांनी परखडपणे मत मांडले. संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख जे. नंदकुमार यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचे समर्थन केले आहे. संघाला महात्मा गांधी वंदनीयच आहेत. त्यामुळेच संघ शाखांत सकाळच्या प्रार्थनेमध्ये महात्मा गांधींचे विचार उमटतात, असे प्रतिपादन त्यांनी केले. दुसरीकडे ज्येष्ठ संघ विचारक मा. गो. वैद्य यांनी गोडसेच्या उदात्तीकरणाचा विरोध केला आहे. नथुराम गोडसे याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली होती. त्यामुळे या मारेकऱ्याचे उदात्तीकरण होता कामा नये. काही संस्था महान व्यक्तीच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण करीत आहेत, ते चुकीचे आहे. लढा वैचारिक असावा, असे मत वैद्य यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)प्रतिमा मलिन
करण्याचा प्रयत्न
नथुराम गोडसेला फाशी दिलेला दिवस संघाकडून बलिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येत असल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या व्यक्तींकडून करण्यात येत आहे. संघाची
प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असून, अशा गोष्टींचे आम्ही समर्थन करीत नाही.
- डॉ. मनमोहन वैद्य, अखिल भारतीय प्रचारप्रमुख, आरएसएस