कारागृहात रंगले महात्मा फुले संमेलन

By Admin | Published: March 11, 2015 02:03 AM2015-03-11T02:03:45+5:302015-03-11T02:03:45+5:30

स्थानिक खुल्या कारागृहात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त मंगळवारी पाचव्या महात्मा फुले सत्यशोधक

Mahatma Phule Sammelan held in jail | कारागृहात रंगले महात्मा फुले संमेलन

कारागृहात रंगले महात्मा फुले संमेलन

googlenewsNext

मोर्शी (अमरावती): स्थानिक खुल्या कारागृहात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त मंगळवारी पाचव्या महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कारागृहात झालेले हे भारतातील पहिले संंमेलन ठरले. संभाजी खराट उद्घाटक, तर माहिती व जनसंपर्क उपसंचालक गणेश मुळे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.
सिंभोरा चौक येथून महात्मा फुले लिखित ‘गुलामगिरी’ व ‘भारतीय संविधान’ या ग्रंथाच्या दिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. संमेलनाचे आयोजक श्रीकृष्ण बनसोड यांनी प्रस्तावना केली. गणेश मुळे यांनी जाती- धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करण्याचे आवाहन केले. तर शाहू, आंबेडकर, फुले यांच्या साहित्यातून नवीन उर्जा मिळते, स्वतंत्र व्यक्तिमत्व विकसित होते. त्यामुळे या साहित्याचे सर्वांनी वाचन करणे आवश्यक असल्याचे मत स्वागताध्यक्ष हिम्मतराव गिरासे यांनी मांडले.

Web Title: Mahatma Phule Sammelan held in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.