Video : "... ही गुंडगिरी खपवून घेणार नाही"; नवाब मलिक यांनी शेअर केला व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 05:08 PM2021-07-05T17:08:19+5:302021-07-05T17:12:51+5:30

Maharashtra Assembly 2021 : विधानसभेत गुंडगिरी, धमक्या व मारामारी करण्याचे काम भाजप करतेय हे लोकशाहीला घातक : नवाब मलिक.

mahavikas aghadi will not tolerate this bullying Video shared by minister Nawab Malik | Video : "... ही गुंडगिरी खपवून घेणार नाही"; नवाब मलिक यांनी शेअर केला व्हिडीओ 

Video : "... ही गुंडगिरी खपवून घेणार नाही"; नवाब मलिक यांनी शेअर केला व्हिडीओ 

googlenewsNext
ठळक मुद्दे विधानसभेत गुंडगिरी, धमक्या व मारामारी करण्याचे काम भाजप करतेय हे लोकशाहीला घातक : नवाब मलिक.या गोष्टी घडताना फडणवीस याचं नेतृत्व करत होते गे दुर्देवी, मलिक यांचं वक्तव्य.

"जनतेने तीन पक्षांना बहुमत दिले असून बहुमताच्या आधारे हे सरकार काम करतेय. मात्र कधी याला तुरुंगात टाकतो तर कधी त्याला तुरुंगात टाकू अशा धमक्या द्यायच्या. आता त्यातून काही होत नाही म्हटल्यावर विधानसभेत गुंडगिरी, धमक्या व मारामारी करण्याचे काम भाजप करतेय हे लोकशाहीला घातक असून ही गुंडगिरी खपवून घेणार नाही," असा इशारा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. दरम्यान, मलिक यांनी तालिका अध्यक्षांच्या केबिनमध्ये झालेल्या गोंधळाचा एक व्हिडीओदेखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात अशी घटना कधी घडली नाही. आणि विशेष म्हणजे या गोष्टी घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचे नेतृत्व करत होते ही दुर्दैवी बाब आहे असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला. "विधानसभेत ओबीसींच्या आरक्षणाबाबत केंद्राकडून इम्पिरियल डाटा मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. त्या प्रस्तावावर विरोधी पक्षाने हरकत उपस्थित केली. त्यामुळे पीठासीन अधिकार्‍यांनी बोलण्याची संधी दिली. त्यानंतर ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुद्देसूद जो घटनाक्रम होता त्याची माहिती दिली. त्यावेळी पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी प्रस्ताव मतास टाकल्यानंतर भाजपचे बरेच आमदार पीठासीन अधिकार्‍यांच्या टेबलकडे गेले. त्यांचा माईक उचलला, राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. शिवाय धक्काबुक्कीही केली. यापेक्षा भयानक म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा माईक आणि स्पीकर फोडला," असेही नवाब मलिक म्हणाले.


आमदारांनी अध्यक्षांना घेरलं
"अध्यक्षांच्या चेंबरमध्ये अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी भास्कर जाधव उपस्थित होते. त्यांच्याजवळ जाऊन भाजपच्या सगळ्या आमदारांनी त्यांना घेरलं. धक्काबुक्की केली, आईबहिणीवरुन शिवीगाळही केली, अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडली नव्हती. भाजपवाल्यांना आता गुंडगिरी करून विधानसभेचे कामकाज थांबवायचे असेल तर ते आघाडी सरकार कधीही खपवून घेणार नाही," अशा स्पष्ट शब्दात मलिक यांनी भाजपला इशारा दिला.

Web Title: mahavikas aghadi will not tolerate this bullying Video shared by minister Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.