गांधी जयंतीपासून महावितरणची ४ प्रादेशिक कार्यालये कार्यान्वित

By admin | Published: September 30, 2016 02:03 AM2016-09-30T02:03:07+5:302016-09-30T02:03:07+5:30

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महावितरणची चार प्रादेशिक कार्यालये अखेर २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी कार्यान्वित होणार आहेत. स्थानिक पातळीवरील निर्णय घेणे

Mahavitaran has 4 Regional Offices implemented from Gandhi Jayanti | गांधी जयंतीपासून महावितरणची ४ प्रादेशिक कार्यालये कार्यान्वित

गांधी जयंतीपासून महावितरणची ४ प्रादेशिक कार्यालये कार्यान्वित

Next

- अतुल जयस्वाल,  अकोला

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महावितरणची चार प्रादेशिक कार्यालये अखेर २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी कार्यान्वित होणार आहेत. स्थानिक पातळीवरील निर्णय घेणे व प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने औरंगाबाद, पुणे, कल्याण व नागपूर येथे स्थापन करण्यात येणार असलेल्या या कार्यालयांची जबाबदारी विभागीय संचालकांवर राहील. सध्या मुंबई येथील ‘प्रकाशगड’ या मुख्यालयावर राज्यभरातील कामकाजाचा भार वाढत असल्याने महावितरण प्रशासनाने औरंगाबाद, पुणे, कल्याण व नागपूर येथे प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.

नागपूर विभागाचे प्रमुख प्रसाद रेशमे
नागपूर व पुणे येथील कार्यालयांवर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
नागपूरचे विभागीय संचालक म्हणून प्रसाद रेशमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अशी आहे रचना
प्रादेशिकअंतर्गत मोडणारे
कार्यालयपरिमंडळ
नागपूरनागपूर, चंद्रपूर,
गोंदिया, अकोला व
अमरावती
औरंगाबादऔरंगाबाद, लातूर,
नांदेड व जळगाव.
पुणेपुणे, बारामती व
कोल्हापूर
कल्याणभांडुप, कल्याण,
नाशिक वरत्नागिरी

Web Title: Mahavitaran has 4 Regional Offices implemented from Gandhi Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.