महावितरणकडून राज्यात विजेचा विक्रमी पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 06:00 PM2018-04-18T18:00:04+5:302018-04-18T18:00:04+5:30
महावितरणने मंगळवारी, 17 एप्रिल 2018 ला राज्यात 19 हजार 816 एवढया मेगावॅट विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला. मागील काही वर्षात वीज यंत्रणेची मोठया प्रमाणात सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे विजेच्या एवढया विक्रमी मागणीचा पुरवठा करणे महावितरणला शक्य झाले.
मुंबई - महावितरणने मंगळवारी, 17 एप्रिल 2018 ला राज्यात 19 हजार 816 एवढया मेगावॅट विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला. मागील काही वर्षात वीज यंत्रणेची मोठया प्रमाणात सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे विजेच्या एवढया विक्रमी मागणीचा पुरवठा करणे महावितरणला शक्य झाले.
राज्यात महावितरणच्या कार्यक्षेत्रात 17 एप्रिल 2018 ला 19 हजार 816 मेगावॅट एवढया विजेची कमाल मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने विजेची ही संपूर्ण मागणी यशस्वीपणे पूर्ण केली. राज्यात वीज यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तसेच या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामेही नियमितपणे केली जातात. त्यामुळे एवढया मोठया प्रमाणातील विजेच्या मागणीचा पुरवठा महावितरणला पूर्ण करता येणे शक्य झाले आहे. सध्या महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून 6 हजार 500 मेगावॅट, केंद्रीय प्रकल्पातून सुमारे 4 हजार 500, खासगी प्रकल्पातून दीर्घमुदतीच्या कराराद्वारे सुमारे 4 हजार 200 मेगावॅट, लघूमुदतीच्या कराराद्वारे सुमारे 635 मेगावॅट तर इतर विविध स्त्रोतांकडून सुमारे 3 हजार 981 वीज उपलब्ध होत आहे.
17 एप्रिलला मुंबईची विजेची सर्वोच्च कमाल मागणी 3 हजार 542 मेगावॅट एवढी नोंदविण्यात आली तर संपूर्ण राज्याची विजेची कमाल मागणी 23 हजार 358 एवढी नोंदविण्यात आली.