महावितरण वीजबिलासाठी 500,1000 च्या नोटा स्वीकारणार

By admin | Published: November 10, 2016 06:08 PM2016-11-10T18:08:41+5:302016-11-10T18:08:41+5:30

महावितरण वीजबिल भरण्यासाठी ११ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ग्राहकांच्या जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारणार आहे.

Mahavitaran will accept 500,1000 notes for electricity bill | महावितरण वीजबिलासाठी 500,1000 च्या नोटा स्वीकारणार

महावितरण वीजबिलासाठी 500,1000 च्या नोटा स्वीकारणार

Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.11 - महावितरण वीजबिल भरण्यासाठी ११ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ग्राहकांच्या जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारणार आहे. ग्राहकाचे वीजबिल जेवढ्या रकमेचे असेल तेवढ्या रकमेच्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार असून, यासाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.
       महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून ११ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे. वीजबिलाचा भरणा करण्यासाठी महावितरणची वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. 
        याशिवाय ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी ज्या ग्राहकांची वीजदेयक भरण्याची मुदत ९ ते १४ नोव्हेंबर अशी आहे ती वाढवून १५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत करण्यात आलेली आहे. तसेच ऑनलाईन वीजबिल भरणा करण्यासाठी ग्राहकांना महावितरणचे www.mahadiscom.in संकेतस्थळ व मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध आहे.
 

Web Title: Mahavitaran will accept 500,1000 notes for electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.