महावितरणची ‘कृषी संजीवनी’
By admin | Published: July 5, 2014 10:06 PM2014-07-05T22:06:57+5:302014-07-05T22:06:57+5:30
थकबाकीदार कृषिपंपधारकांसाठी ‘महावितरण’ने कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे.
Next
बारामती : थकबाकीदार कृषिपंपधारकांसाठी ‘महावितरण’ने कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार कृषिपंपधारकांनी मार्च-2क्14 अखेर थकीत असलेल्या बिलातील 5क् टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरली, तर उरलेली 5क् टक्के मूळ रक्कम, तसेच व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे. बारामती मंडलात सव्वा लाखाहून अधिक कृषिपंपधारक असून, त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक:यांना 31 मार्चअखेरच्या थकबाकीपैकी 5क् टक्के रक्कम एकरकमी अथवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरावी लागेल. यात 31 ऑगस्ट व 3क् सप्टेंबर 2क्14 र्पयत किमान 2क् टक्क्याचे दोन हप्ते, तर 31 ऑक्टोबर 2क्14 र्पयत 1क् टक्के अथवा उर्वरित रक्कम भरावी लागेल. मूळ थकबाकीतील 5क् टक्के रक्कम एकरकमी भरण्यासाठी 31 ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे.
कृषी संजीवनी योजनेत सहभागी न होणा:या अथवा ठरवून दिलेल्या रकमेचा भरणा न केलेल्या कृषिपंपधारकांना अपात्र ठरविण्यात येईल.
तसेच अपात्र कृषिपंपधारकांच्या वीजबिलात नियमानुसार व्याज व दंडासहित पूर्ण रक्कम दाखविण्यात येईल. याशिवाय त्यांच्यावर
थकबाकी वसुलीसाठी कारवाई करण्यात येईल. कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेण्यासाठी
ग्राहकांनी संबंधित शाखा अथवा उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘महावितरण’च्या वतीने करण्यात आले आहे . (प्रतिनिधी)
4योजनेत सहभागी झालेल्या कृषिपंपधारकांना 5क् टक्के मूळ थकबाकीचा भरणा केल्यानंतर, 1 एप्रिल 2क्14 नंतरच्या सर्व वीजबिलांचा पूर्णपणो व नियमित भरणा करणो आवश्यक आहे. अशी नियमित बिले भरणा:यांनाच या योजनेत सहभागी होता येईल.
4ज्या कृषिपंपधारकांची 31 मार्च 2क्14 पयर्ंत थकबाकी नसेल, त्यांची पुढील दोन त्रैमासिक बिले 5क् टक्के माफ करण्यात येतील.
4बारामती मंडलात बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर, दौंड व शिरूर या तालुक्यांतील 1 लाख 28 हजार 2क्8 कृषिपंपधारक ग्राहकांना या योजनेचा लाभ होणार आहे.