महावितरणचे आता 'एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक '

By admin | Published: October 20, 2016 08:43 PM2016-10-20T20:43:29+5:302016-10-20T20:43:29+5:30

मीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर विद्युत विषयक सेवा तातडीने उपलब्ध व्हाव्यात आणि ग्रामिण भागातील नागरिकांचे वीज पुरवठ्यासंदभार्तील प्रश्न लवकर सुटावेत

Mahavitaran's 'One Village, One Village Electrical Manager' | महावितरणचे आता 'एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक '

महावितरणचे आता 'एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक '

Next

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २० : ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर विद्युत विषयक सेवा तातडीने उपलब्ध व्हाव्यात आणि ग्रामिण भागातील नागरिकांचे वीज पुरवठ्यासंदभार्तील प्रश्न लवकर सुटावेत म्हणून महावितरणतर्फे पुरविण्यात येणाऱ्या काही सेवा ग्रामपंचायतींमार्फत उपलब्ध करून देण्यासाठी एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक ही योजना अंमलात आणण्यास तसेच ग्रामपंचायतींनी फ्रेंच्याईझी तत्वावर काम करावे यासाठी ऊर्जा विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी दिल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली़ या योजनेमूळे राज्यातील ग्रामिण भागातील २३ हजार आयटीआय धारकांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. आयटीआय धारकांना ही दीवाळीची भेट असल्याचेही ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले.

फ्रेंच्याईझी म्हणून मीटर रिंडींग घेणे, वीज देयकांचे वाटप करणे, ब्रेकडाऊन अटेंड करणे, वीजपुरवठा पुर्ववत करणे, डीओ फ्युज टाकणे, फ्युज कॉल तक्रारी अटेंड करणे, रस्त्यावरील पथदिव्यांची देखभाल, दुरूस्ती किंवा बदली करणे, नवीन जोडणीची कामे करणे, थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करणे आदी कामे ग्रामपंचायतींनी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या कामांकरिता प्रति विद्युत ग्राहक ९ रुपये शुल्क ग्रामपंचायतींना देण्यात येईल. ग्राम विद्युत व्यवस्थापकास प्रतिग्राहक ९ रुपये प्रमाणे प्राप्त होणारे उत्पन्न किंवा ३००० रुपये यापैकी जे अधिक असेल ते महावितरण तर्फे देण्यात येईल. ग्राम विद्युत व्यवस्थापकाचे पद कंत्राटी राहील. ग्राम विद्युत व्यवस्थापकाने केलेल्या कामाच्या बदल्यात त्याला देय होणारी रक्कम देण्याबाबतची कार्यपध्दती ग्रामविकास विभागाकडून निश्चित करण्यात येईल. राज्यातील ३००० लोकसंख्यापर्यंतच्या २३६१७ ग्रामपंचायतींमध्ये ही योजना राबविण्यात येईल. या योजनेकरीता १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे असेही महावितरणच्या प्रशासनाने सांगितले.

ग्राम विद्युत व्यवस्थापकाने करावयाच्या कामांमधील जोखीम विचारात घेता त्याचे विमा संरक्षाणासाठी महावितरण कंपनी योग्य योजना तयार करेल किंवा त्यापोटी वार्षिक ठराविक रक्कम प्रिमियमसाठी देईल. ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक केल्यानंतर त्याला प्रस्तावित कामे करण्याकरीता आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्रीची महावितरण कंपनीमार्फत अग्रीम रक्कम किंवा साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्यात येईल.

ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्याकरीता ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक वृत्तपत्रात जाहीरात प्रसिध्द करण्यात येईल. सदर जाहीरात ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील महत्वाच्या ठिकाणी लावण्यात येईल. ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून नेमणूकीकरीता एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेच्या आाधारे (आय.टी.आय चे गुण) सदर व्यक्तीची निवड करण्यात येईल.

सदर शैक्षणिक अर्हतेनुसार ग्रामपंचायतीमार्फत योग्य निवड केलेल्या व्यक्तीस विद्युत वाहिनीवर काम करण्याकरीता आवश्यक ते संपूर्ण कौशल्य विकास महावितरण कंपनीमार्फत करण्यात येईल. सदर व्यक्ती प्रस्तावित कामे करण्यास पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र महावितरण कंपनी देईल. महावितरण कंपनीने सदर व्यक्ती प्रमाणद्वारे अपात्र असल्याबाबत कळविल्यास गुणवत्तेनुसार प्रतिक्षा यादीतील पुढील व्यक्तीस प्रशिक्षणासाठी महाविरतण कंपनीकडे पाठविण्यात येईल. सदर प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ग्रामपचायत सदर ग्राम विद्युत व्यवस्थापकाला ११ महिन्यांकरीता कार्य आदेश देईल. असमाधानकारक काम /अपरिहार्य कारणास्तव ग्राम विद्युत व्यवस्थापकाचे कार्य आदेश रद्द करण्याचे अधिकार ग्रामापंचायतीस राहतील. ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तीमधून वर नमूद अर्हता धारण करणारी व्यक्तीची ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यासाठी पात्र राहील.

यासाठी इच्छुक व अर्हताधारक करणारी व्यक्ती एखाद्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध होऊ शकला नाही तर 5 कि.मी. परिसरातील इतर ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्ती ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्याकरीता निवडीसाइी पात्र राहील. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील 5 कि.मी. परिसरातही इच्छुक व अर्हताधारक करणारी व्यक्ती उपलब्ध होऊ शकला नाही तर, महावितरणने राज्यामध्ये नेमलेल्या कंपन्यामध्ये ५ वर्ष काम करणारा कंत्राटी कामगार हा ग्राम विद्युत व्यवस्थापक करीता त्या त्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात अर्ज करण्यास पात्र राहील. ग्राम विद्युत व्यवस्थापकावर महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता यांचे तांत्रिक नियंत्रण व ग्रामपंचायतीचे प्रशासकीय नियंत्रण राहील.

Web Title: Mahavitaran's 'One Village, One Village Electrical Manager'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.