फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 05:40 PM2024-11-25T17:40:02+5:302024-11-25T17:41:25+5:30
सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की विद्यमान मुख्यमंत्री आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली ते एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लेक्ष लागले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर, आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की विद्यमान मुख्यमंत्री आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली ते एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लेक्ष लागले आहे. महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजेच 132 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेने 54 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या आहेत.
फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक -
दरम्यान, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिनही नेत्यांची आज (25 नोव्हेंबर) सायंकाळी दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार आहे. एकनाथ शिंदे आज सायंकाळपर्यंत दिल्लीत पोहोचतील, तर श्रीकांत शिंदे दिल्लीत पोहोचले आहेत. दरम्यान, नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला 3-4 दिवसही लागू शकतात, असेही वृत्त आहे.
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपचा शिंदेंसाठी 'बी' प्लॅन? -
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा सोपवली गेली, तर भाजपकडे एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्लॅन 'बी' काय असू शकतो? एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्रीपदावर येतील का? हा प्रश्न आहे. अशा स्थितीत फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तर भाजप एकनाथ शिंदे यांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण देऊ शकते आणि एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात.
पुन्हा 1 CM आणि 2 DCM चा फॉर्म्युला -
माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. याशिवाय, महाराष्ट्रातात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा जुनाच याफॉर्म्युला पुढेही लागू राहणार असल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार आणि उपमुख्यमंत्री कोण होणार यावर सस्पेन्स कायम आहे. या तिन्ही पदांसंदर्भातील नावे दिल्लीतूनच ठरवली जाणार आहेत.