लाडक्या बहिणींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 10:05 PM2024-11-05T22:05:45+5:302024-11-05T22:07:27+5:30
Mahayuti Kolhapur Sabha :शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000, MSP वर 20% अनुदान, पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती.
Mahayuti Kolhapur Sabha : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला आजपासून सक्रियपणे सुरुवात झाली. कोल्हापूरमध्ये आज महाविकास आघाडी आणि महायुतीची सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीववर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, राज्यातील महिला, शेतकरी, वृद्ध आणि तरुणांसाठी 10 महत्त्वाच्या घोषणाही केल्या आहेत.
#Live l 05-11-2024 📍कोल्हापूर 📡कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ मेळावा व जाहीर सभा - लाईव्ह https://t.co/WDTCo7HAsz
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 5, 2024
एकनाथ शिंदे यांनी दहा वचनांची घोषणा केली आहे. त्यात सत्ता आल्यास लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सध्या 1500 रूपये दिले जातात, त्यात वाढ करून 2100 रूपये दर महिन्याला देण्याचे शिंदे यांनी जाहीर केले. तसेच, राज्यातील पोलीस दलात 25 हजार महिलांची केली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. शेतकरी सन्नान योजनेच्या रक्कम मध्ये ही वाढ केली जाईल. सध्या 12 हजार दिले जातात, ते 15000 करण्यात येई. राज्यात महायुतीचे सरकार आल्यास या घोषणांची अंमलबजावणी केली जाईल असे शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणा
- लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 दिले जाणार. राज्यातील पोलीस दलात 25,000 महिलांची भरती.
- शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 मिळणार. तसेच MSP वर 20% अनुदान दिले जाणार.
- प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा दिला जाणार.
- वृद्ध पेन्शन धारकांना रु.1500 वरुन रु.2100 मिळणार.
- राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवल्या जाणार.
- 25 लाख रोजगार निमिर्ती, तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन मिळणार.
- राज्यातील ग्रामीण भागात 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधले जाणार.
- अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला रु.15,000 वेतन मिळणार.
- वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर दिला जाणार.
- सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर केला जाणार.
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान