महायुती अधांतरीच!

By admin | Published: September 21, 2014 03:19 AM2014-09-21T03:19:28+5:302014-09-21T03:19:28+5:30

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री उशिरा ‘मातोश्री’वर केलेली चर्चाही निष्फळ ठरल्याने महायुती अधांतरीच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Mahayuti Undertaking! | महायुती अधांतरीच!

महायुती अधांतरीच!

Next
चर्चेचे गु:हाळ संपेना : शिवसेनेचा नवा प्रस्तावही भाजपाने फेटाळला
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना-भाजपा युतीमधील चर्चेचे गु:हाळ सुरुच आहे. शिवसेनेने देऊ केलेला 126 जागांचा प्रस्ताव भाजपाने फेटाळला असून, त्याचवेळी रिपाइंने मित्रपक्षांना 20 जागा सोडण्याची आग्रही मागणी केल्याने महायुतीमधील जागावाटपाचा पेच गंभीर झाला आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री उशिरा ‘मातोश्री’वर केलेली चर्चाही निष्फळ ठरल्याने महायुती अधांतरीच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 
आता उद्या (रविवार) शिवसेनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे युतीबाबत काय भूमिका जाहीर करतात आणि भाजपाच्या दिल्लीत होणा:या केंद्रीय निवड मंडळाच्या बैठकीत उमेदवारांची यादी निश्चित होते का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेने 126 जागा भाजपाला देऊ केल्या असून स्वत: 155 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सात जागा शिवसेना सोडणार असून रिपाइं, रासपा व शिवसंग्राम या पक्षांना भाजपाने आपल्या कोटय़ातून नऊ जागा सोडाव्यात आणि स्वत: 117 जागा लढवाव्यात, असा नवा प्रस्ताव शिवसेनेने शनिवारी सायंकाळी भाजपाला पाठवला असल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिली. भाजपाच्या कोअर कमिटीने हा प्रस्ताव अमान्य केला आहे.
रात्रीची चर्चाही निष्फळ
देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा ‘मातोश्री’वर दाखल झाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा केली; मात्र या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही. भाजपाला दिलेल्या 126 जागांमधून मित्र पक्षांना जागा सोडणो म्हणजे भाजपाला तोटा करून घेणो होय, असे फडणवीस यांनी सांगितल्याचे समजते. आम्हीही सेनेला प्रस्ताव दिला असून त्यावर सकारात्मक विचार होईल, अशी आशा आहे. सेनेच्या प्रस्तावानुसार आमच्या वाटय़ाला 119 पेक्षा कमी जागा येऊ शकतात, असेही ते म्हणाले.
महायुतीमधील जागावाटपाचे गाडे अडून राहू नये याकरिता रिपाइं व राष्ट्रीय समाज पार्टीला जागा देऊ नका, अशी भूमिका रामदास आठवले व महादेव जानकर यांनी शुक्रवारी वृत्तवाहिन्यांकडे जाहीर केल्याने या पक्षांना जागा सोडू नका, असा सल्ला शिवसेनेने भाजपाला दिला होता. त्यावर भाजपाने रिपाइंकडे विचारणा केली असता खा.आठवले यांनी मित्रपक्षांना एकूण 2क् जागा सोडाव्या व त्यापैकी 1क् जागा रिपाइंला द्याव्यात, अशी मागणी केली. आठवले यांच्या फॉम्यरुलानुसार शिवसेनेने 144, भाजपाने 124  तर मित्रपक्षांनी 2क् जागा लढवाव्या, असे सुचवले आहे. सेनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक रविवारी रंगशारदा सभागृहात होत असून त्यामध्ये उद्धव ठाकरे हे महायुतीबाबत आपली भूमिका मांडतील. 
त्याचवेळी भाजपाच्या केंद्रीय निवड मंडळाची बैठक रविवारी दिल्लीत होत असून त्यामध्ये आपल्या उमेदवारांची यादी निश्चित करण्याचे भाजपाने ठरवले आहे. 
संघाला हवी युती
भाजपाला अपल्या मित्रपक्षांना एकापाठोपाठ एक सोडून देणो परवडणारे नसल्याने महाराष्ट्रात शिवसेनेसोबतची युती काही झाली तरी टिकवून ठेवावी, असे स्पष्ट संकेत रा. स्व. संघाने भाजपा नेतृत्वास दिले असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात भाजपाचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांची, ‘अजूनही चर्चा सुरु असताना चिंता कशाला करायची?हे वक्तव्य सूचक मानले जात आहे.
खरा वाद मुख्यमंत्रीपदाचा
युतीमधील तणावाचा खरा मुद्दा मुख्यमंत्रीपदाचा आहे, असे सूत्रंचे म्हणणो आहे. मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा भाजपाने मान्य करावा, असा शिवसेनेचा आग्रह आहे. या मुद्दय़ाचा आताच निर्णय केला नाही तर निवडणुकीनंतर अधिक गुंता निर्माण होईल, असे शिवसेनेला वाटते. मात्र निवडणुकीच्या आधीच असा कोणताही शब्द देण्यास भाजपाचे नेतृत्व राजी नाही, असे सूत्रंनी सांगितले.
 
 
घाटकोपर पश्चिम, माहीम, विलेपार्ले या जागा भाजपाला हव्यात
च्शिवसेना व भाजपा या दोन पक्षात काही जागांची अदलाबदल करायची आहे. मात्र त्यापैकी एकही जागा सोडायला शिवसेना तयार नाही. 
च्तासगाव मतदारसंघात गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पराभूत करण्याकरिता अजित घोरपडे यांच्यासाठी भाजपाला हा मतदारसंघ हवा असून घाटकोपर (प.)मधील मनसेचे राम कदम यांनी भाजपात प्रवेश केला आहे. परंतु हे मतदारसंघही सेना सोडायला तयार नाही. 
 
च्माहीम मतदारसंघ सोडण्याची मागणी भाजपाने शिवसेनेकडे केली आहे. येथे महापालिका निवडणुकीत मनसेचे नगरसेवक विजयी झाल्याने भाजपाने दावा केला आहे. 
 
च्विलेपार्ले मतदारसंघावरही भाजपाने हक्क सांगितला आहे. याखेरीज युतीत सिन्नरवरूनही तणाव निर्माण झाला आहे.
च्शिवसेनेने भाजपाला दिलेला 126 जागांचा प्रस्ताव मान्य केला तरच त्या पक्षाच्या नेत्यांबरोबर जागांच्या अदलाबदलीची चर्चा केली जाऊ शकते, असे मत शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांनी व्यक्त केले.
 
 
 

 

Web Title: Mahayuti Undertaking!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.