...तर महेश भट्ट, करण जोहर मार खातील- मनसे
By admin | Published: October 10, 2016 09:11 PM2016-10-10T21:11:17+5:302016-10-10T21:11:17+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेणा-या महेश भट्ट आणि करण जोहरला चांगलेच फटकारले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेणा-या महेश भट्ट आणि करण जोहरला चांगलेच फटकारले आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही कलाकारांना काम देऊ नका, अन्यथा मार खाण्यास तयार राहा, असा इशाराच अमेय खोपकर यांनी दिला आहे.
पाकिस्तानी कलाकारांना विरोध करणा-या आमच्या भूमिकेवर मी ठाम आहे. पाकिस्तान कलाकारांना कायम विरोध करत राहीन. 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'रईस' हे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्यास त्याला विरोध करून हे चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही. चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही आमच्या भाषेत त्याला उत्तर देऊ, असेही अमेय खोपकर म्हणाले आहेत.

कार्यकर्त्यांना जेल झाली तरी चालेल. मात्र साम, दाम, दंड, भेद या आयुधांचा वापर करून हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित करण्यापासून रोखणार असल्याचंही अमेय खोपकर यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात सुरू केलेलं आंदोलन मागे घेण्यास नकार देऊन ते अधिक तीव्र करण्याचे सूतोवाच केले आहेत. त्यामुळे 'रईस' आणि 'ए दिल है मुश्किल' चित्रपटावरील टांगती तलावर अद्यापही कायम आहे.

तत्पूर्वी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनच्या सदस्यांनी मनसे नेत्यांची भेट घेत 'रईस' आणि 'ए दिल है मुश्किल' चित्रपट रिलीज होऊ देण्याची विनंती केली होती. मात्र हे आता मनसेचं आंदोलन राहिलं नसून प्रत्येक सामान्य व्यक्तीचं आंदोलन असल्याचं सांगत विनंती फेटाळून लावली होती. मनसेने विरोधाची भूमिका मागे घेण्यास नकार देत आंदोलन कायम ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.