मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर महागणार टोल
By admin | Published: March 23, 2017 08:15 AM2017-03-23T08:15:01+5:302017-03-23T11:34:33+5:30
दर तीन वर्षांनी टोल वाढ करण्याची अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्ये काढली होती. त्यानुसार ही टोलवाढ करण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास गतिमान करणा-या 'एक्सप्रेस वे' चा टोल महागणार असल्याचे वृत्त आहे. एक्सप्रेस वे च्या टोलमध्ये तब्बल 35 रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. सध्या 195 रुपये असणारा टोल 230 रुपये होणार आहे. तब्बल 18 टक्क्यांची ही टोलवाढ असून 1 एप्रिलपासून नव्या दराने टोलवसुली करण्यात येईल.
दर तीन वर्षांनी टोल वाढ करण्याची अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्ये काढली होती. त्यानुसार ही टोलवाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गावरुन दररोज मोठया प्रमाणावर वाहनांची ये-जा असते.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा प्रस्ताविक टोलवाढीला तीव्र विरोध आहे. कारण राज्य सरकार आणि बांधकाम कंपनीने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या बांधणीसाठी केलेला सर्व खर्च वसुल झाला आहे. दोघांनी बक्कळ नफा कमावला आहे. मग टोलवसुली कशासाठी ? अशा माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा सवाल आहे.