आगामी महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता मिळविण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेस व भाजपामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. महिलेसाठी महापौर पद आरक्षित झाल्याची बातमी कळताच महिला उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुंबईमध्ये मंत्रालयातील सभागृहात ११ महापालिकांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
प्रभागांची रचना जाहीर केल्याबरोबरच महापौर पदाची आरक्षणे जाहीर केली जातात. यंदा आॅक्टोबर २०१५ मध्ये प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली, मात्र महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली नव्हती. महापालिकेच्या आरक्षणाची सोडत कधी निघणार, याची इच्छुकांकडून सातत्याने निवडणूक अधिकाºयांकडे विचारणा केली जात होतीे. अखेर शुक्रवारी महापौर पद कुठल्या प्रवर्गासाठी राखीव असणार याचा सस्पेन्स संपला.