दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 09:55 AM2024-11-23T09:55:38+5:302024-11-23T10:01:29+5:30
Mahim, Worli Assembly Election 2024 Result Live Updates: २८८ पैकी एक हायव्होल्टेज मतदारसंघ असलेल्या माहीममध्ये दुसऱ्या फेरीचा कल हाती आला आहे.
Mahim, Worli Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता वेग आला असून पहिल्या काही फेऱ्यांचे कल हाती आले आहेत. २८८ पैकी एक हायव्होल्टेज मतदारसंघ असलेल्या माहीममध्ये राज ठाकरेंचा पूत्र अमित ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. तर सदा सरवणकर हे दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.
दुसऱ्या फेरीचा कल हाती आला आहे. यामध्ये अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर तर उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत हे पहिल्या क्रमांकावर आले आहेत. आधीच्या फेरीत अमित ठाकरे आघाडीवर होते. नंतर सरवणकर आघाडीवर होते. एकंदरीतच शेवटच्या फेरीपर्यंत मोठी उलथापालथ या मतदारसंघांत पहायला मिळणार आहे.
वरळीतून शिंदे गटाचे मिलिंद देवरा हे पिछाडीवर आहेत. तर आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला शनिवारी होणार असून, महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्तेत येणार, याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. या निमित्ताने राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांपैकी ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी मतदानाचा हक्क २० नोव्हेंबरला बजावला होता. मतदानाची टक्केवारी ६६.०५ इतकी होती. १५८ लहान-मोठे पक्ष आणि अपक्ष असे मिळून ४ हजार १३६ उमदेवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.