महायुतीत गुपचूप वाटाघाटी!

By admin | Published: August 3, 2014 01:56 AM2014-08-03T01:56:03+5:302014-08-03T01:56:03+5:30

महायुतीतील जागावाटपासाठी जाहीरपणो बैठका घेण्याऐवजी पडद्याआड गुपचूप वाटाघाटी सुरू आहेत.

Mahuwait secretly negotiated! | महायुतीत गुपचूप वाटाघाटी!

महायुतीत गुपचूप वाटाघाटी!

Next
मुंबई : महायुतीतील जागावाटपासाठी जाहीरपणो बैठका घेण्याऐवजी पडद्याआड गुपचूप वाटाघाटी सुरू आहेत. महायुतीतील लहान घटक पक्षांनी अव्वाच्या सव्वा जागांची मागणी पुढे केल्यामुळे शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी वाटाघाटीचा हा मार्ग निवडला आहे.
मागील आठवडय़ात महायुतीतील नेत्यांची एकत्रित बैठक मुंबईत झाली, मात्र त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रिपाइं या घटक पक्षांनी जागांची भलीमोठी यादी सादर केली होती. घटक पक्षांची मागणी लक्षात घेता, जाहीर बैठकांमध्ये  जागा वाटपावरून ‘तू-तू, मैं-मैं’ होऊ नये म्हणून एकावेळी एकाच पक्षासोबत बोलणी करण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.  
जागावाटपाची पुढील जाहीर बैठक 5 ऑगस्टला होणार होती; मात्र आता ती पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. महायुतीमधील लहान घटक पक्षांपैकी सर्वाधिक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी आणि शिवसंग्राम या क्रमाने जागा मिळण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)
 
भाजपाचेही मिशन 288?
 भाजपाने सर्व 288 मतदारसंघांतील इच्छुकांचे अर्ज मागविले असल्यामुळे वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत, पण यामागे स्वबळावर लढण्याचा हेतू नाही. ही आमची नेहमीची 
पद्धत आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 
रा. स्व. संघ सक्रियच
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकसभा निवडणुकीप्रमाणो विधानसभा निवडणुकीत सक्रिय नसल्याचे म्हटले जात होते. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्याचा इन्कार केला. आमच्या विविध पातळीवर समन्वयाच्या बैठकी सुरू आहेत. लोकसभेप्रमाणोच याहीवेळी संघ सक्रिय राहील, असा दावा या नेत्याने केला. 
 
दीपक केसरकर यांचा आमदारकीचा राजीनामा
च्मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी येथील आमदार दीपक केसरकर यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. 
ते 5 ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. केसरकर यांनी आज सकाळी विधानभवनात आपल्या समर्थकांसह येऊन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यालयात राजीनामा सादर केला. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा पक्षाध्यक्ष
शरद पवार यांच्याकडे सोपविला होता, पण त्यांनी तो अध्यक्षांकडे
पाठविलेला नव्हता. 
च्केसरकर यांनी सांगितले की, र}ागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशतीविरुद्ध मी उभा राहिलो. पण माङया या लढय़ाला राष्ट्रवादीकडून साथ मिळत नसल्याने आपण पक्ष सोडावा असा माङया समर्थकांचा आग्रह होता. त्यानुसार मी राष्ट्रवादीचा आधीच राजीनामा दिला आहे. 
च्चेम्बर ऑफ कॉमर्सचे दोन वेळा अध्यक्ष राहिलेले आशिष पेडणोकर, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश दळवी आणि कृषी क्षेत्रतील अग्रणी शिवाजी कुबल हेही आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती केसरकर यांनी 
दिली. 

 

Web Title: Mahuwait secretly negotiated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.