दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा ११ आॅक्टोबरला

By admin | Published: October 5, 2016 05:34 AM2016-10-05T05:34:15+5:302016-10-05T05:34:15+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

The main event on Deekshabhoomabhoomi 11 October | दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा ११ आॅक्टोबरला

दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा ११ आॅक्टोबरला

Next

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गुरुवार दि. सहापासून सोहळ्याला सुरुवात होत असून मुख्य सोहळा हा अशोक विजयादशमीच्या दिवशी ११ आॅक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता होईल.
दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत यासंबंधी सविस्तर माहिती देताना दिली. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या यंदाच्या मुख्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कर्नाटकचे समाजकल्याण मंत्री एच. अंजय्या, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके उपस्थित राहतील. 

Web Title: The main event on Deekshabhoomabhoomi 11 October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.