ऊस उत्पादकांच्या खिशावर वाहतूक खर्चाचा भार कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 11:00 AM2019-05-10T11:00:00+5:302019-05-10T11:00:02+5:30

शेतकऱ्यांच्या शेतातून कारखान्यापर्यंत ऊस वाहतूक आणि तोडणीचा भार हा संबंधित शेतकऱ्यांवर टाकला जातो.

Maintenance of transport received by sugarcane farmers | ऊस उत्पादकांच्या खिशावर वाहतूक खर्चाचा भार कायम

ऊस उत्पादकांच्या खिशावर वाहतूक खर्चाचा भार कायम

googlenewsNext
ठळक मुद्दे राज्यातील असमानता कायम : ४४ कारखान्यांनी कापले सातशेच्यावर रक्कमउसाच्या रास्त आणि किफायतशीर दरातून (एफआरपी) त्याची रक्कम वजा करुन एफआरपी

पुणे : ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चातील (एच अ‍ॅण्ड टी) राज्यातील असमानता कायम असून, पावणेपाचशे ते नऊशे दरम्यान वाहतूक-तोडणी खर्चाची रक्कम शेतकऱ्यांच्या खिशातून कापली जात आहे. तोडणी-वाहतुक खर्चात एकसमानता नसल्याने काही शेतकऱ्यांना वाहतूक खर्चाचा अधिक भार सोसावा लागत आहे. राज्यातील तब्बल ४४ कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून प्रतिटन सातशे रुपयांहून अधिक रक्कम कापली आहे. 
राज्यातील १९५ कारखाने ऊस गाळप हंगामात सहभागी झाले होते. प्रत्येक कारखाना साधारण परिघातील २५ किलोमीटर अंतराहून ऊस गाळपासाठी आणत असतो. शेतकऱ्यांच्या शेतातून कारखान्यापर्यंत ऊस वाहतूक आणि तोडणीचा भार हा संबंधित शेतकऱ्यांवर टाकला जातो. उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरातून (एफआरपी) त्याची रक्कम वजा करुन एफआरपी दिली जाते. गेल्यावर्षीपर्यंत काही कारखाने अकराशे रुपयांची रक्कम देखील ऊस तोडणीच्या रुपात कापून घेत होती. त्याची ओरड झाल्यानंतर ‘एच अ‍ॅण्ड टी’चा दर ठरविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर अजूनही निर्णय न झाल्याने प्रत्येक कारखाने आपापल्या सोयीने वाहतूक खर्च एफआरपीतून कापत आहेत. 
राज्यातील १९५ पैकी ४४ कारखाने ७०० रुपयांच्या वर वाहतूक-तोडणी खर्च कापत असून, त्यातील १५ कारखान्यांनी ८०० रुपयांपेक्षा अधिक रक्कम कापलेली आहे. तर, उर्वरीत कारखान्यांचा खर्च हा पाचशे ते ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. सांगलीच्या एच. के. अहिर कारखान्याने सर्वात कमी ४९३ रुपयांची कपात वाहतूक तोडणी खर्चापोटी केली आहे. तर, त्या खालोखाल पुण्याच्या छत्रपती कारखान्याने ५०१.८९ रुपये कापलेले आहेत. म्हणजेच बहुतांश कारखान्यांना वाहतूक-तोडणी खर्च ५०० ते ७०० रुपयांदरम्यान राखणे शक्य झाले असताना काही कारखानांना अधिक खर्च कसा येत आहे, हा प्रश्न अजूनही कायम आहे. 
----------------------

विदर्भ-मराठवाड्यातील शेतकºयांना सर्वाधिक फटका

साखर उताऱ्यानुसार एफआरपीची रक्कम ठरते. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश कारखान्यांचा सरासरी साखर उतारा साडेआठ ते अकरा टक्के इतका आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देखील तुलनेने कमी मिळते. त्यातच वाहतूक आणि तोडणी खर्च आकरणाऱ्या ४४ कारखान्यांपैकी २४ कारखाने हे विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत.  त्यावर वाहतूक-तोडणी खर्च सातशे आणि आठशे रुपये प्रति टन असल्याने त्या प्रमाणात एफआरपीची रक्कम येथील शेतकºयांना कमी मिळते. 
-------------------------

Web Title: Maintenance of transport received by sugarcane farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.