माती परीक्षणाने उत्पादनात दुपटीने वाढ : गायकवाड
By admin | Published: April 29, 2016 01:43 AM2016-04-29T01:43:16+5:302016-04-29T01:43:16+5:30
माती परीक्षण करून खतांचे व्यवस्थापन केल्यास उत्पादनात दुपटीने वाढ होत असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांनी व्यक्त केले
राहू : माती परीक्षण करून खतांचे व्यवस्थापन केल्यास उत्पादनात दुपटीने वाढ होत असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांनी व्यक्त केले. पाणवली येथे शेतीदिनानिमित्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग दौंड तालुका कृषी खात्याच्या व पाणावली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी भुईमूग प्रकल्पांतर्गत शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे आयोजन करण्यात आले होते.
तब्बल बारा आठवडे हे प्रशिक्षण घेण्यात आले होते. या वेळी गायकवाड बोलत होते. खरीप हंगामात शेतकऱ्यांना फळबाग लागवड बाजरी प्रात्यक्षिके ठिबक सिंचन, कांदा चाळ, गांडुळ खत, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार योजना यांसारख्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी गायकवाड यांनी केले. या वेळी डॉ. मनोज आवारे यांनी बदलती शेती वा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारित शेती कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले, तर कृषी पर्यवेक्षक दयानंद बनसोडे यांनी खरीप पिकांची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सरपंच संजय भांड, डी. जी. आहेरकर, जी. के. घोडेराव, ग्रामस्थ उपस्थित होते.