सूर्याभोवती दिसले तेजोवलय

By admin | Published: June 12, 2015 03:59 AM2015-06-12T03:59:45+5:302015-06-12T03:59:45+5:30

निरभ्र आकाशात सूर्य आग ओकत असतानाच गुरुवारी दुपारी सूर्याभोवती दिसलेले तेजोवलय अनेकांनी अनुभवले़ पावसाळ्याच्या सुरुवातीला

The majesty seen around the sun | सूर्याभोवती दिसले तेजोवलय

सूर्याभोवती दिसले तेजोवलय

Next

नांदेड : निरभ्र आकाशात सूर्य आग ओकत असतानाच गुरुवारी दुपारी सूर्याभोवती दिसलेले तेजोवलय अनेकांनी अनुभवले़ पावसाळ्याच्या सुरुवातीला अतिउंच प्रदेशाकडील भागात अशा प्रकारचे तेजोवलय दिसून येते़ परंतु नांदेड, परभणी, पुण्यासह राज्याच्या काही भागात गुरुवारी असे तेजोवलय अनुभवता आले़
सकाळी ११़३० ते दुपारी १ वाजेपर्यंत सूर्याभोवतीचे तेजोवलय स्पष्टपणे दिसत होते. या तेजोवलयाला इंग्रजीमध्ये हालो असे संबोधतात़
ढगांमधील बर्फाच्या स्फटिकांवर प्रकाश पडल्यानंतर ते २२ अंशांच्या कोनातून निरीक्षकांकडे वळतात़ त्यामुळे सूर्याकडे पाहणाऱ्याला सूर्याभोवती असे मनोहारी तेजोवलय दिसते़ (प्रतिनिधी)

Web Title: The majesty seen around the sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.