वायू सेना अन् नाशिक जिल्ह्याकडून शहीद कमांडो मिलिंद यांना मानवंदना; ओझर विमानतळावरून भावूक वातावरणात पार्थिव बोराळेच्या दिशेने लष्करी वाहनात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:19 PM2017-10-12T14:19:30+5:302017-10-12T15:44:06+5:30

चंदीगढ येथून ज्या खास वायूसेनेच्या विमानाने कमांडो मिलिंद यांचे पार्थिव नाशिकला आणले गेले त्या विमानात खैरनार यांच्या वीरपत्नी हर्षदा, मुलगी वेदिका, मुलगा कृष्णा हेदेखील होते. विमानतळावरून सकाळी दहा वाजता नंदूरबार जिल्ह्यातील बोराळे गावाच्या दिशेने लष्करी वाहन कमांडो मिलिंद यांचे पार्थिव घेऊन निघाले.

 Majlis and Milk Commandos from the Nashik district; In the emotional atmosphere from Ojhar airport, the Parthiv left for the military vehicle towards Borale | वायू सेना अन् नाशिक जिल्ह्याकडून शहीद कमांडो मिलिंद यांना मानवंदना; ओझर विमानतळावरून भावूक वातावरणात पार्थिव बोराळेच्या दिशेने लष्करी वाहनात रवाना

वायू सेना अन् नाशिक जिल्ह्याकडून शहीद कमांडो मिलिंद यांना मानवंदना; ओझर विमानतळावरून भावूक वातावरणात पार्थिव बोराळेच्या दिशेने लष्करी वाहनात रवाना

Next
ठळक मुद्देबोराळे गावात गंभीर शोकाकू वातारवरण पसरले असून संपुर्ण गाव देशभक्तीपर गीतांनी दुमदुमून गेलेएकूणच मिलिंद यांना आलेले वीरमरण महराष्ट्रासाठी अभिमानास्पद व गर्वाची बाब नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन व पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.

नाशिक : जम्मू-काश्मिरच्या हाजीन सेक्टरपरिसरात बुधवारी झालेल्या अतिरेक्यांशी चकमकीत भारतीय वायू दलाच्या विशेष गरूड कमांडो पथकाचे जवान महाराष्टचे सुपुत्र मिलिंद खैरनार यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज सकाळी नाशिकच्या ओझर येथील ‘एचएएल’च्या विमानतळावर चंदीगढ येथून खास वायूसेनेच्या विमानाने आणण्यात आले. यावेळी वायू सेनेच्या वतीने जवानांच्या तुकडीने लष्करी इतमामात खैरनार यांना मानवंदना दिली. तसेच नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन व पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. चंदीगढ येथून ज्या खास वायूसेनेच्या विमानाने कमांडो मिलिंद यांचे पार्थिव नाशिकला आणले गेले त्या विमानात खैरनार यांच्या वीरपत्नी हर्षदा, मुलगी वेदिका, मुलगा कृष्णा हेदेखील होते. विमानतळावरून सकाळी दहा वाजता नंदूरबार जिल्ह्यातील बोराळे गावाच्या दिशेने लष्करी वाहन कमांडो मिलिंद यांचे पार्थिव घेऊन निघाले. वाहन साक्रीच्या पुढे पोहचले असून पुढीत तासाभरात पार्थीव असलेले वाहन बोराळे गावात दाखल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रावर शोककळा; नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्याचा दु:खाचा डोंगर कोसळला मुळ नंदूरबारच्या बोराळे गावाचे रहिवासी असलेले कमांडो मिलिंद हे वीस वर्षे साक्रीमध्ये होते. कारण वडील किशोर खैरनार हे महावितरणमध्ये सेवेत असताना साक्री येथे त्यांची नियुक्ती होती. साक्रीमध्ये कमांडे मिलिंद यांचे शालेय शिक्षण पुर्ण झाले. बालपणही साक्रीत गेले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी कमांडो धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयात दाखल झाले. वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत असतानाच त्यांना वायू सेनेत भरती होण्याची संधी लाभली आणि देशसेवेचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरले अन् मग त्यांच्या आनंदापुढे आकशही ठेंगणे झाले होते. तेव्हापासूनच केवळ प्राथमिक सैनिकी प्रशिक्षणावरच समाधान न मानता क मांडो मिलिंद यांनी दोन वर्षांचे गरुड कमांडोचे खास प्रशिक्षण, पॅरा, एनएसजी कमांडोचे प्रशिक्षण पुर्ण केले. एकूणच मिलिंद यांनी स्वत:ला देशसेवेसाठी झोकून देत आलेल्या प्रत्येक संकटावर मात करत स्वत:ला अष्टपैलू सैनिक म्हणून घडविले होते.
कमांडो मिलिंद यांचा जसा नंदूरबारच्या बोराळेशी संबंध आहे तेवढाच संबंध साक्री, धुळे आणि नाशिकशीदेखील आहे. सेवानिवृत्तीनंतर कमांडो यांचे आई-वडील नाशिकच्या म्हसरूळ जवळील स्नेहनगर येथील गणेश प्लाझा अपार्टमेंटमध्ये स्थायिक झाले होते. एकूणच मिलिंद यांना आलेले वीरमरण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद व गर्वाची बाब जरी असली तरी महराष्ट्रासाठी शोककळा पसरली असून नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बोराळे गावात भावूक गंभीर शोकाकूल वातावरण, देशभक्तीपर गीतांनी दुमदुमले गाव
बोराळे गावात गंभीर शोकाकू वातारवरण पसरले असून संपुर्ण गाव देशभक्तीपर गीतांनी दुमदुमून गेले आहे. येथील ग्रामपंचायतीचे कार्यालय, प्राथमिक शाळांमधून ध्वनिक्षेपकांवरून देशभक्तीपर गीते वाजविली जात आहे. तसेच सातत्याने आवाहन करत गावाचा सुपुत्र कमांडो मिलिंद यांना श्रध्दांजली वाहत त्यांच्या कर्तबगारीच्या इतिहासाला उजाळा दिला जात आहे. वृत्तपत्रांमधून प्रसिध्द झालेल्या मिलिंद यांच्या कारकिर्दीची माहिती सांगितली जात आहे. त्यांच्या राहत्या घरी नातेवाईक, गावकºयांची गर्दी जमली असून तापी नदीच्या काठावर शासनाच्या वतीने मिलिंद यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कारासाठी चौथरा उभारण्यात आला आहे. चौथºयाभोवती फुलांची सजावट करण्यात आली आहे. गावाच्या सुपुत्राचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सर्वांच्या नजरा रस्त्याकडे खिळल्या आहेत. कमांडो मिलिंद यांचे पार्थिव घेऊन वाहन कधी गावात दाखल होते, याची सर्वांना प्रतीक्षा आहे. गावात पोलीस फौजफाटाही वाढविण्यात आला असून पंचक्रोशीमधील अबालवृध्द शेकडोंच्या संख्येने गावात जमण्यास सुरूवात झाली आहे.

Web Title:  Majlis and Milk Commandos from the Nashik district; In the emotional atmosphere from Ojhar airport, the Parthiv left for the military vehicle towards Borale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.