राज्यातील प्रमुख ५६ धरणांनी गाठला तळ; गतवर्षीपेक्षा ७ टक्के कमी पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 09:49 AM2023-06-19T09:49:03+5:302023-06-19T09:49:21+5:30

राज्यात नागपूर विभागातील १६ मुख्य धरणांपैकी केवळ दोन धरणांची पातळी खालावली आहे. उ

Major 56 dams in the state reached bottom; 7 percent less water than last year | राज्यातील प्रमुख ५६ धरणांनी गाठला तळ; गतवर्षीपेक्षा ७ टक्के कमी पाणी 

राज्यातील प्रमुख ५६ धरणांनी गाठला तळ; गतवर्षीपेक्षा ७ टक्के कमी पाणी 

googlenewsNext

- बाळासाहेब बोचरे

मुंबई : यंदा पाऊस कमी पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असतानाच, बिपोरजॉय वादळामुळे मान्सूनही लांबला असून, अजून उन्हाच्या झळा सुरूच आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा लक्षणीय घटला असून, गतवर्षाच्या तुलनेत तो सात टक्क्यांनी कमी आहे. 

राज्यात नागपूर विभागातील १६ मुख्य धरणांपैकी केवळ दोन धरणांची पातळी खालावली आहे. उर्वरित १२३ प्रमुख धरणांपैकी ५४ धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. विशेषत: पुणे आणि कोकण विभागातील धरणांनी तळ गाठला आहे. राज्यातील प्रमुख १३९ धरणांतील साठा गतवर्षी सरासरी ३०.७२ टक्के होता, तो आजच्या घडीला सरासरी २३.७४ टक्के झाला आहे.  

या पार्श्वभूमीवर राज्यातील मध्यम प्रकल्पाचे मात्र आशादायी चित्र असून, एकूण २६० प्रकल्पांमध्ये सरासरी ३०.७२ टक्के साठा असून, तो गतवर्षीच्या तुलनेत सरासरी चार टक्के अधिक आहे. राज्यातील  लघुप्रकल्पामध्येही आशादायी चित्र आहे. एकूण २,५९० लघुप्रकल्पामध्ये सरासरी १६.९७ टक्के साठा असून, तो गतवर्षी  १३.४३ टक्के होता. 

पाण्यासाठी दाही दिशा
राज्यात पाणीटंचाईच्या अतिशय तीव्र झळा महाराष्ट्रातील जनतेला भोगाव्या लागत आहेत. राज्यात २,७५४ गावे व वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागत असून ५२३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

१३९ धरणांमधील पाणीसाठा

विभाग    धरणे    पाणीसाठा    गतवर्षी
अमरावती    १०    ३९.८३%    ४०.८०%
औरंगाबाद    ४४    ३३.५९%    ३६.८९%
कोकण    ११    २७.५९%    ३५.५९%
नागपूर    १६    ४०.९२%    ३०.६७%
नाशिक    २३    २७.६५%    २७.०७%
पुणे    ३५    १०.४२%    १३.३१%
एकूण    १३९    २३.७४%    ३०.७२%

Web Title: Major 56 dams in the state reached bottom; 7 percent less water than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण