मेजर गोगोईंना शिवसेनेचा मानाचा मुजरा! - उद्धव ठाकरे

By admin | Published: May 25, 2017 08:15 AM2017-05-25T08:15:38+5:302017-05-25T08:18:31+5:30

आम्ही स्वतः मेजर गोगोईंच्या धाडसाने व सन्मानाने प्रभावित झालो आहोत असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलले आहेत

Major Gogoi was considered a Shiv Sena leader! - Uddhav Thackeray | मेजर गोगोईंना शिवसेनेचा मानाचा मुजरा! - उद्धव ठाकरे

मेजर गोगोईंना शिवसेनेचा मानाचा मुजरा! - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - जम्मू काश्मीरात दगडफेक करणा-यांपैकी एकाला मानवी ढाल बनवून जीपला बांधणा-या मेजर लीतुल गोगोई यांच्या कृत्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं आहे. आम्ही स्वतः मेजर गोगोईंच्या धाडसाने व सन्मानाने प्रभावित झालो आहोत. मेजरसाहेबांना शिवसेनेचा मानाचा मुजरा! असे कौतुगोद्गार उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयच्या माध्यमातून काढले आहेत. 
 
जवान लढत असताना त्यांच्या शौर्याची चेष्टा करणाऱ्या लोकांना हिंदुस्थानी नागरिक म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. जवानांनी हिजबूलचा कमांडर अश्रफ वाणीला मारले, म्हणून आमच्या स्वातंत्र्य व स्वाभिमानाचे श्राद्ध घालणारी ही जमात त्या अश्रफ वाणीपेक्षा भयंकर ठरत आहे. पंतप्रधान मोदी यांनी अशा बेताल व चवचाल जिभेच्या लोकांविरुद्ध कठोर कायद्याचे प्रयोजन करायलाच हवे. आम्ही स्वतः मेजर गोगोईंच्या धाडसाने व सन्मानाने प्रभावित झालो आहोत असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
एका कश्मिरी तरुणास लष्कराच्या जीपला बांधून ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला व कश्मीरात मानवी हक्कांचे काय व कसे उल्लंघन होत आहे यावर आमच्या सैन्यालाच गुन्हेगार ठरविण्यात आले. या मानवी हक्कांच्या ठेकेदारांची मजल इथपर्यंत गेली की, ज्याने त्या अतिरेकी तरुणास जीपला बांधले त्या लष्करी अधिकाऱ्यास बडतर्फ करा, त्याचे कोर्टमार्शल करा, अशा पद्धतीने त्यांच्या जिभा वळवळू लागल्या, पण त्या राष्ट्रद्रोही जिभांची पर्वा न करता जीपच्या तोंडी कश्मिरी तरुणास बांधून ठेवणारे मेजर नितीन गोगोई यांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ कॉमन्डेशनने सन्मानित केले. त्यामुळे आमच्या सैन्यदलाचे मनोबल अधिकच वाढणार आहे असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.
 
अर्थात मेजर गोगोईंच्या या सन्मानाविरोधात काही विचारवंत दहशतवाद्यांच्या जिभा व मेंदू वळवळू लागल्याच आहेत व त्या अरुंधती जिभांचे योग्य ते कोर्टमार्शल अभिनेता व खासदार परेश रावल यांनी केले आहे. परेश रावल यांनी जे कोर्टमार्शल केले ती जनभावना व संतापाचा उद्रेक आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी परेश रावल यांच्या वादग्रस्त ट्विटचं समर्थन केलं आहे.
 
त्या तरुणास जीपला का बांधले हो? असा आक्रोश करणाऱ्यांनी तो तरुण तेथे कोणता ‘शांतीपाठ’ वाचत होता याची चौकशी केली नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
मुळात सैन्य हे सैन्य असते. मग ते कोणत्याही देशाचे असो. सैन्याला नेमून दिलेले कार्य, उद्दिष्ट त्यांनी कर्तव्यकठोरपणे पार पाडायचे असते. ते करत असताना अतिरेकी मानवतेचे अवडंबर माजवून चालत नाही. एका मर्यादेपलीकडे माणुसकीची धर्मशाळा करून चालणार नाही. अर्थात ढोंगी मानवतावादाचे मुखवटे घालणाऱयांना हे कसे समजणार? त्यातही वाद जम्मू-कश्मीरमधील लष्करी कारवाईबाबत असेल तर अशा मंडळींना मानवतावादाचे उमाळे जरा जास्तच फुटतात. खरे म्हणजे मानवतेच्या नावाखाली कश्मीर खोऱ्यातील माथेफिरू तरुणांना जे सहानुभूती दाखवतात त्यांच्या मानेवर डोकी नसून पाकिस्तानात बनवलेली रिकामी मडकीच आहेत अशी सणसणीत टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 
 
कश्मीरात रोजच जवानांवर हल्ले सुरू आहेत. जवान मारले जात आहेत. हे सर्व मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे आहे असे या अरुंधतीछाप विचारवंत अतिरेक्यांना वाटत नाही. मात्र अतिरेक्यांशी लढणाऱ्या मेजर गोगोईस सन्मानित केले म्हणून त्यांच्या पोटात दुखायला लागले. मग त्या अतिरेकी व हिंदुस्थानविरोधी घोषणा देणाऱ्या तरुणास ‘पद्म’ पुरस्कार किंवा वीरचक्राने सन्मानित करायला हवे होते काय? असा संपत्त सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
 
अरुंधती रॉय या मोठ्य़ा, पुरस्कार विजेत्या लेखिका आहेत. त्याबद्दल सर्वांना आदरच आहे, पण त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील विषयात डोके न घातलेले चांगले. विशेषतः कश्मीरसारख्या प्रश्नाबाबत देशाची एक तीव्र भावना आहे. त्या भावनेचा अनादर होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. कश्मीरातील हिंसेचे व समस्येचे मूळ आपल्याच भूमीवरील अशा लोकांच्या मानसिकतेत आहे असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

Web Title: Major Gogoi was considered a Shiv Sena leader! - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.