महापालिका सदस्यांच्या मानधनात मोठी वाढ

By admin | Published: July 16, 2017 04:16 AM2017-07-16T04:16:49+5:302017-07-16T04:16:49+5:30

राज्यातील सर्व महापालिकांमधील नगरसेवकांचे मानधन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. त्यानुसार मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना मासिक २५ हजार रुपये मानधन मिळेल.

Major increase in municipal membership | महापालिका सदस्यांच्या मानधनात मोठी वाढ

महापालिका सदस्यांच्या मानधनात मोठी वाढ

Next

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील सर्व महापालिकांमधील नगरसेवकांचे मानधन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. त्यानुसार मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना मासिक २५ हजार रुपये मानधन मिळेल.
मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचे मानधन २००८ मध्ये तर इतर महापालिकांतील नगरसेवकांचे मानधन हे २०१० मध्ये निश्चित करण्यात आले होते. शनिवारी त्यात वाढ करण्यात आली. वाढत्या महागाईचा विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे.

- मुंबईच्या नगरसेवकांचे मानधन वाढून अडीच पट झाले आहे. अ वर्ग महापालिकांतील मानधन वाढून सुमारे पावणेतीन पट झाले आहे. ब, क आणि ड वर्ग पालिकांमधील नगरसेवकांच्या मानधन वाढून दुप्पट झाले आहे.

नगरसेवकांचे मानधन ...
अ+ : मुंबईआधीचे आताचे
१०,००० २५,०००
अ वर्ग : नागपूर, पुणे आधीचे आताचे ७,५००२०,०००
ब वर्ग :
पिंपरी, ठाणे, नाशिक आधीचे आताचे ७,५०० १५,०००
क व ड वर्ग :
अन्य सर्व महापालिका
आधीचे आताचे
७,५०० १०,०००

Web Title: Major increase in municipal membership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.