मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 05:49 AM2018-06-21T05:49:58+5:302018-06-21T05:49:58+5:30

पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असून, मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांच्या बढत्या आणि बदल्या बुधवारी जाहीर करण्यात आल्या आहेत.

Major reshuffle in Mumbai Police force | मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल

मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल

Next

मुंबई : पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असून, मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांच्या बढत्या आणि बदल्या बुधवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या आदेशाने या नवनियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीस दलातील १२ अधिका-यांना त्यांच्या शहराबाहेरील नियुक्तीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले आहे.
बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या बदल्या आणि बढतींमधील विशेष म्हणजे मुंबईत कार्यरत ४८ पोलीस निरीक्षकांनाही वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे.
याशिवाय सहायक पोलीस आयुक्त पदावर बढतीनंतर करण्यात आलेल्या बदल्यांमुळे सध्या कार्यरत असलेल्या २१ सहायक पोलीस आयुक्तांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस दलातील अधिका-यांच्या सुरू असलेल्या या बढती तसेच बदलीच्या सत्रामुळे मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
>बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे : कंसात बदलीचे ठिकाण
व्यंकट पाटील - वरिष्ठ निरीक्षक - घाटकोपर ठाणे (वाहतूक शाखा)
अविनाश धर्माधिकारी - वरिष्ठ निरीक्षक - साकीनाका ठाणे (डोंगरी ठाणे- सहायक आयुक्त)
बाळासाहेब काकड - वरिष्ठ निरीक्षक - मांटुगा ठाणे (आर्थिक गुन्हे शाखा)
किरण काळे- वरिष्ठ निरीक्षक - वर्सोवा ठाणे (आर्थिक गुन्हे शाखा)
सूर्यकांत तरडे - वरिष्ठ निरीक्षक - वाहतूक शाखा ठाणे (गुन्हे शाखा)
अभय शास्त्री - सहायक आयुक्त - आर्थिक गुन्हे शाखा (आर्थिक गुन्हे शाखा)
प्रभाकर लोके - सहायक आयुक्त - आर्थिक गुन्हे शाखा (आर्थिक गुन्हे शाखा)
सुनिल भोईटे - सहायक आयुक्त - आर्थिक गुन्हे शाखा (आर्थिक गुन्हे शाखा)
विनोद शिंदे - सहायक आयुक्त - आर्थिक गुन्हे शाखा (आर्थिक गुन्हे शाखा)
राजेंद्र चव्हाण- सहायक आयुक्त - गिरगाव ठाणे (संरक्षण आणि सुरक्षा)
शंकरसिंग रजपूत - सहायक आयुक्त - मंत्रालय सुरक्षा (मुख्यालय तीन)
शरद नाईक - वरिष्ठ निरीक्षक - एलटी मार्ग ठाणे (मुख्य नियंत्रण कक्ष)
पांडुरंग शिंदे - वरिष्ठ निरीक्षक - डी. बी. मार्ग ठाणे (मुख्य नियंत्रण कक्ष)
विलास शिंदे - वरिष्ठ निरीक्षक - विशेष शाखा (नेहरूनगर ठाणे)
सुधीर निगुडकर - वरिष्ठ निरीक्षक - विशेष शाखा (घाटकोपर ठाणे)
सुरेश पाटील - वरिष्ठ निरीक्षक - विशेष शाखा (धारावी ठाणे)
श्रीराम कोरेगावकर - वरिष्ठ निरीक्षक- विशेष शाखा (सांताक्रुझ ठाणे)
दिनेश कदम - पोलीस निरीक्षक - खार ठाणे (भायखळा ठाणे)
गिरीश अणावकर - पोलीस निरीक्षक - विशेष शाखा (वांद्रे ठाणे)
गोकुळसिंग पाटील - पोलीस निरीक्षक - चारकोप ठाणे (गावदेवी ठाणे)
पंढरीनाथ वावळे - पोलीस निरीक्षक - गुन्हे शाखा (जुहू ठाणे)
संतोष राऊत - पोलीस निरीक्षक - आर्थिक गुन्हे शाखा (लोकमान्य टिळक मार्ग ठाणे)
गुलाबराव मोरे - पोलीस निरीक्षक - माता रमाबाई आंबेडकर ठाणे (व्ही.पी.रोड ठाणे)
लक्ष्मण डुंबरे - वनराई ठाणे (बोरीवली ठाणे)
कैलास चव्हाण - पोलीस निरीक्षक - वाहतूक शाखा (माहिम ठाणे)
संजय जोशी - पोलीस निरीक्षक- अँटॉप हिल ठाणे (विक्रोळी ठाणे)
पुष्कराज सूर्यवंशी - पोलीस निरीक्षक - काळाचौकी ठाणे(नवघर ठाणे- वरिष्ठ निरीक्षक)
सुखलाल वर्पे - वरिष्ठ निरीक्षक - माता रमाबाई आंबेडकर मार्ग ठाणे (वरळी ठाणे)
राजेंद्र चिखले - वरिष्ठ निरीक्षक - सशस्त्र पोलीस दल (काळाचौकी)


मृदुला लाड - वरिष्ठ निरीक्षक - सायन ठाणे (विशेष शाखा२)
नवी मुंबईतील अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे
दिलीप काळे (वांद्रे विभाग)
जनार्दन थोरात (गुन्हे शाखा)
संभाजी निकम (पश्चिम नियंत्रण कक्ष)
संजय शिंदे (विशेष शाखा २)
सुनील कुलकर्णी (वाहतूक शाखा)
बजरंग बनसोडे (ट्रॉम्बे विभाग)
धुळा टेळे (मंत्रालय सुरक्षा विभाग)
>ठाण्यातील अधिकाºयांच्या बदल्या पुढीलप्रमाणे
दिलीपकुमार राजभोज (विशेष शाखा १)रवींद्र बडगुजर - पोलीस निरीक्षक - पालघर (वर्सोवा)नितीन बोबडे- लोहमार्ग मुंबई (मानखुर्द ठाणे- वरिष्ठ निरीक्षक)

Web Title: Major reshuffle in Mumbai Police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.