भारीला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवा
By Admin | Published: August 26, 2015 03:18 AM2015-08-26T03:18:44+5:302015-08-26T03:18:44+5:30
देशात सर्वत्र स्मार्ट सिटीची चर्चा सुरू आहे. त्याच धर्तीवर अधिकाऱ्यांनी आता सांसद आदर्श ग्राम असलेल्या भारीला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवावे, असे आवाहन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे
यवतमाळ : देशात सर्वत्र स्मार्ट सिटीची चर्चा सुरू आहे. त्याच धर्तीवर अधिकाऱ्यांनी आता सांसद आदर्श ग्राम असलेल्या भारीला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवावे, असे आवाहन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे
चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी येथे केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सांसद आदर्श ग्राम भारीच्या विकासकामांचा आढावा मंगळवारी आयोजित बैठकीत घेतला गेला.
देशाच्या विकासात गावांचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण विकासावर भर दिला आहे. सांसद आदर्श ग्राम
योजना ही त्यांचीच संकल्पना आहे. या योजनेतील भारी या गावाचा
सर्वांगीण विकास करायचा आहे. देशातील ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून भारीला नावारुपास आणायचे आहे. भारी गावाला पंतप्रधानांच्या स्वप्नातील आदर्श गाव बनविण्यासाठी अधिकाऱ्यांचे योगदान महत्वाचे
आहे. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अधिकाऱ्यांनी भारीला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनविल्यास आपण पंतप्रधानांना या गावात आणू, अशी ग्वाही दर्डा यांनी दिली.
आढावा बैठकीला माजी आमदार कीर्ती गांधी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, अरविंद पांडे, भारीचे सरपंच गणपतराव गाडेकर आदी उपस्थित होते.
(जिल्हा प्रतिनिधी)
विमानतळ विकासावरही चर्चा
या बैठकीपूर्वी विजय दर्डा यांनी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी त्यांच्या कक्षात विविध मुद्यांवर सखोल चर्चा केली. यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा विमानतळाचा विकास, सहकारातील जिल्ह्णात एकमेव सुरू असलेली प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी समोरील अडीअडचणी, महामार्ग-रेल्वे आणि विमान वाहतूक या दळणवळणाच्या सोई-सुविधा नसल्याने येथे उद्योग थाटण्यात निर्माण होणाऱ्या समस्या, शेतकरी-शेतमजुरांचे प्रश्न आदी मुद्दे या वेळी चर्चेत होते.
शासनाने यवतमाळच्या विमानतळ विकासाचा रिलायन्ससोबत करार केला. मात्र रिलायन्स संथगतीने विकास करीत आहे. त्यामुळे हा करार रद्द करणे जिल्ह्णाच्या हिताचे राहील, असेही दर्डा यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सूचविले.