मेक इन इंडिया भारताचा सर्वांत मोठा ब्रॅंड - नरेंद्र मोदी
By admin | Published: February 13, 2016 07:18 PM2016-02-13T19:18:06+5:302016-02-13T19:54:32+5:30
मेक इन इंडिया सप्ताहाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी उद्धाटन करण्यात आले. यावेळी मेक इन इंडिया भारताचा सर्वांत मोठा ब्रॅंड असून यामध्ये रोजगार निर्मिती हेच मुख्य
Next
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - देशाच्या उद्योग क्षेत्राला नवी झळाळी देण्याच्या उद्देशाने मुंबईत आयोजित केलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी मेक इन इंडिया भारताचा सर्वांत मोठा ब्रॅंड असून यामध्ये रोजगार निर्मिती हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
मेक इन इंडिया सप्ताहाचे मुख्य केंद्र असलेल्या बीकेसी मैदानावर पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी ११.३०च्या सुमारास भेट दिली. त्यानंतर सायंकाळी वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियामध्ये सप्ताहाच्या उद्घाटनाचा मुख्य समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते झाला. यावेळी स्वीडनचे पंतप्रधान केजेल लॉफव्हेन, फिनलँडचे पंतप्रधान जुहा पेट्री सिपिला, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक नेते आणि उद्योजक यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही मुद्दे : -
- मेक इन इंडिया भारताचा सर्वांत मोठा ब्रॅंड आहे, जगाच्या अर्थकारणात भारताता २२ टक्के वाटा आहे.
- यंदाचे वर्ष सर्वाधिक जास्त कोळसा उत्पादनाचे मानले जाईल.
- भारतात परकीय गुंतवणूक वाढली आहे, मेक इन इंडियाचे उद्दिष्ट रोजगार निर्मिती.
- भारतात व्यवसाय करायला सुलभ वातावरण तयार करणार.
- इन इंडिया भारताचा सर्वांत मोठा ब्रॅंड आहे, जगात आर्थिक प्रगतीत भारताचा २२ टक्के वाटा आहे.
- भाजपाची सत्ता आल्यानंतर एफडीआयमध्ये ४८ टक्के वाढ झाली.
- मेक इन इंडियामध्ये अंतर्गत कर प्रणाली सोपी आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात येईल.
- मेक इन इंडियाच्या कार्यक्रमाने आम्हाला आत्मविश्वास दिला आहे.
- भारताची प्रगती सर्वांगिण करण्याचे आमचे ध्येय आहे.
- २०१५ मध्ये वाहनांचं उत्पादन सर्वांत जास्त झाले.
- भारतात अनेक संधी आहेत.
- भारतात उत्पादन क्षेत्रात १२ टक्के वाढ झाली.
- आम्ही मेक इन इंडियामधील तरुण उद्योजकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू.
- भारतातील रेल्वे, मेट्रो स्थानकात पेंटिंग्ज करण्यात येणार.
- हे शतक आशिया खंडाचं असणार आहे.