'मेक इन इंडीया'- एक 'मस्ट सी' इव्हेन्ट..
By admin | Published: February 16, 2016 05:17 PM2016-02-16T17:17:17+5:302016-02-16T17:17:17+5:30
पण आता मात्र म्हणेन, "काय करायचंय फॉरिन, आपला देश अशा शंभर फॉरिनच्या तोंडात मारील आता.."...प्रत्येकाने हे प्रदर्शन बघाच..!!
Next
>- गणेश साळुंखे
मी माझ्या दोन मुलांना घेऊन वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये भरवलेल्या 'मेक इन इंडीया:मेकींग इंडीया' प्रदर्शनाला जाऊन आलो. सरकारच्या पुढाकाराने भरवलेलं हे बहुदा पहिलंच प्रदर्शन असावं..
खरंतर 'प्रदर्शन' हा मराठी शब्द याचं भऽऽव्य स्वरूप सांगण्यासाठी खुप तोकडा आहे.., परंतू मराठी भाषेतील दुसरा शब्द नसल्याने मी 'प्रदर्शन' हाच शब्द मी वापरतोय..
आपला देश जगातली किंवा आशिया खंडातील उगवती महाशक्ती आहे वगैरे पुढारगप्पा (पुढाऱ्यांनी स्टेजवरून मारलेल्या गप्पा) मी गेली काही वर्ष ऐकत होतो. पेपरमधल्या अशाच 'महागप्पां'च्या बातमी खालीच एखादी महाघोटाळ्याची बातमी किंवा मग कुपोषणामुळे काही मुलं दगावल्याची बातमी असायची आणि मग महाशक्ती वगैरे केवळ थापा असाव्यात असं वाटायचं. परंतू आज पंतप्रधानांच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या पुढाकारानं मुंबईत भरलेलं प्रदर्शन पाहिलं आणि मग मात्र माझ्या देशाच्या 'समर्थ'पणाबद्दल खात्री पटली..
अहो काय नाही या प्रदर्शनात? घरात डोक्याखाली घ्यायच्या उशीच्या साध्या कव्हरांपासून, देशाच्या वेशीवर खड्या असलेल्या 'आकाशा'दी देशाच्या सरंक्षक मिसाईल कव्हरापर्यंत सर्व सर्वकाही आज माझ्या देशात बनतं हे बघून उर भरून येतो..ग्राहकोपयोगी वस्तू ते हायटेक-सुपरटेक संरक्षण सामग्रीपर्यंत सर्व काही 'मेड इन इंडीया'..! इट्स रिअली ग्रेऽऽऽट..!!
आपण त्या त्या प्रोडक्टबद्दल कोणतेही व कितीही बावळटपणाचे प्रश्न विचारा, तिथं उभे असलेले तज्ज्ञ आपल्या शंकांची सोप्प्या शब्दात परंतू सविस्तर माहिती देतात..त्याच्या शब्दांतून आत्मविश्वास ओसंडून वाहात असतो..हे सर्व सरकारी आहे यावर विश्वासच बसत नाही..अनेक तरूण मुलं-मुली त्या त्या पॅव्हेलियनमध्ये उभ्या असलेल्या तंत्रज्ञांना माहिती विचारत होती. त्याचं कुतूहल जागृत झालेलं त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं..मी एका तंत्रज्ञाला तसं विचारलंही, की 'तुम्ही गव्हर्नमेंट अधिकारी असून येवढी माहिती आणि ती ही प्रेमाने कशी सांगता?' त्याने दिलेलं उत्तर मनाला छू कर गेलं..तो म्हणाला, "सर अब यह देश काफी तरक्की कर रहा है, हमे जनता को सब इन्फर्मेशन देने के लिए कहा गया है.. वह इसलीए की क्या पता भविष्य मे इन्ही के अंदर से कोई 'एपीजे अब्दुल कलाम'साब देश को मील जाये?..ओर अब हमे एक नही, अनेक कलामसाब की जरूरत है.!!." धीस इज गव्हर्नमेंट..!!
पंतप्रधानांनी हे सर्व सामान्य जनतेसाठी खुलं करून दनतेला देशाच्या प्रगतीत भागीदार करून घेतलं, जनतेची देशाबरोबरची नाळ घट्ट केली याबद्दल त्यांचं अभिनंदन करायलाच हवं..! देशात जे जे काही पॉझिटिव्ह घडतंय ते जनतेसमोर मांडायलाच हवं..
जाता जाता-
मी प्रदर्शनात (याला दुसरा सक्षम मराठी शब्द नाही का हो एखादा?) काय पाहिलं त्याचं प्रवासवर्णन करणार नाही, ते प्रत्येकाने जाऊन पाहावं..परंतू मी जर 'पूर्वीचा मी' असतो तर हे प्रदर्शन (छे, परत तोच तोकडा शब्द) पाहून म्हटलं असतं, "अरेच्या, आपण फॉरिनमध्ये आहोत की काय?".. पण आता मात्र म्हणेन, "काय करायचंय फॉरिन, आपला देश अशा शंभर फॉरिनच्या तोंडात मारील आता.."
प्रत्येकाने हे प्रदर्शन बघाच..!!
सुचना - प्रदर्शनात १६ वर्ष खालिल मुलांना प्रवेश नाही. जाताना सोबत आधार कार्ड व आणखी एखादं फोटो आयडी घेऊन जाणं..पॅन कार्ड अजिबात चालत नाही.