मेक इन इंडियाचा मार्ग महाराष्ट्रातूनच

By admin | Published: February 14, 2016 12:36 AM2016-02-14T00:36:52+5:302016-02-14T00:36:52+5:30

देशाच्या सकल उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के असून, निर्यात व थेट परकीय गुंतवणुकीतही महाराष्ट्रच देशात अव्वल आहे, असे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मेक इन

Make in India route from Maharashtra | मेक इन इंडियाचा मार्ग महाराष्ट्रातूनच

मेक इन इंडियाचा मार्ग महाराष्ट्रातूनच

Next

मुंबई : देशाच्या सकल उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के असून, निर्यात व थेट परकीय गुंतवणुकीतही महाराष्ट्रच देशात अव्वल आहे, असे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मेक इन इंडियाचा मार्ग मेक इन महाराष्ट्रद्वारेच प्रशस्त होईल, असा विश्वास आज व्यक्त केला.
मेक इन इंडिया सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात फडणवीस प्रास्ताविकात म्हणाले की, या सप्ताहानिमित्त आलेल्या देशविदेशातील गुंतवणूकदारांच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे. भारत हा गुंतवणुकीसाठी जगात सर्वोत्तम असल्याचे अहवाल अनेक संस्था देत आहेत. देशात महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम असे राज्य करण्यासाठी आपल्या सरकारने पावले उचलली आहेत. मेक इन इंडियामध्ये राज्याराज्यात निकोप स्पर्धा सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीने आज देशाचा एकूण विकासविषयक दृष्टिकोनच पूर्णत: बदलला आहे. मेक इन महाराष्ट्रसाठी आपल्या सरकारने ईझ आॅफ डुर्इंग बिझनेसअंतर्गत नवीन गुंतवणुकीसाठी पोषक असे वातावरण तयार केले आहे. ५० वर्षांत झाल्या नसत्या अशा बाबी आम्ही केल्या आहेत. परवाना राज संपविण्याच्या दिशेने परवान्यांची संख्या अतिशय कमी करण्यात आली आहे. एकखिडकी योजना आणली आहे. किरकोळ व्यापार धोरण, इलेक्ट्रॉनिक धोरण, पर्यटन धोरण आम्ही आणले आहे. मुंबईत बीकेसी येथे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियामध्ये झालेल्या या समारंभाला देशविदेशातील उद्योगपती, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसेच मंत्री, महाराष्ट्राचे जवळपास सर्व मंत्री, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)

स्विडनचे पंतप्रधान स्टिफन लोवान यांनी, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या प्रक्रियेत स्विडन सोबत असल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले की, मी आमच्याकडील उद्योगपती आणि अधिकाऱ्यांचे मोठे शिष्टमंडळ घेऊन आलो आहे. भारतातील गुंतवणूक आम्ही निश्चितपणे वाढविणार आहोत. आम्ही भारताला विश्वासू आणि दीर्घकालीन भागीदार समजतो.

फिनलँड उत्सुक
युरोपचे गेट वे असलेल्या फिनलँडचे पंतप्रधान जुहा पॅट्री सिपिला यांनी भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. परवडणारी घरे, अपारंपरिक ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीवर भर असेल, असे ते म्हणाले.

Web Title: Make in India route from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.