‘मेक इन कोपरगाव’ नवा आदर्श ठरेल - गिरीराज सिंह
By admin | Published: May 8, 2016 02:07 AM2016-05-08T02:07:14+5:302016-05-08T02:07:14+5:30
विदेशीचा त्याग करून स्वदेशीचा स्वीकार करण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला़ त्यानंतर घरोघरी चरखे आले़ त्यापासून बनलेले कापड वापरण्यात येत होते़ ‘मेक इन इंडिया’ची
कोपरगाव (अहमदनगर) : विदेशीचा त्याग करून स्वदेशीचा स्वीकार करण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला़ त्यानंतर घरोघरी चरखे आले़ त्यापासून बनलेले कापड वापरण्यात येत होते़ ‘मेक इन इंडिया’ची सुरूवात गांधीजींनी केली़ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तीच संकल्पना राबवित आहेत़ त्यामुळे ‘मेक इन कोपरगाव’ हा ग्रामीण भागातील उपक्रम देशात नवा आदर्श ठरेल, असे मत केंद्रीय उद्योगमंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले़ कोपरगाव व्यापारी महासंघाच्या ‘मेक इन कोपरगाव’ लघुउद्योग यंत्रसामग्रीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात गिरीराजसिंह म्हणाले, भारताच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम राबविण्यात येत असून लघुउद्योगही मोठ्या प्रमाणात सुरू झाले पाहिजे़ (प्रतिनिधी)