“मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करा अन्...”; कुणी केली मागणी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 06:45 PM2023-12-07T18:45:44+5:302023-12-07T18:49:48+5:30

Manoj Jarange Patil: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील अनेक प्रश्न आहे. यामुळे मराठा आरक्षण सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.

make manoj jarange patil chief minister for one month and give maratha reservation issue demand from chhatrapati sambhaji nagar | “मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करा अन्...”; कुणी केली मागणी? 

“मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करा अन्...”; कुणी केली मागणी? 

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत कायम असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर असून, विविध भागांमध्ये जाऊन सभा घेत आहेत. यातच आता मनोज जरांगे यांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 

मराठा समाजास ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची केलेली मागणी लावून धरली आहे. मात्र, ओबीसी समाजाने याला तीव्र विरोध केला आहे. यामुळे ओबीसी समाज आणि मराठा समाज आमनेसामने आला आहे. छगन भुजबळ यांनी अनेकदा सडकून टीका केली आहे. याला मनोज जरांगे यांनी उत्तर दिले आहे. यातच आता मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करा अन्...

संभाजीनगरमधील विशाल नंदरकर यांनी एका स्टँपपेपरवर लिहून मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी नायक चित्रपटाप्रमाणे मुख्यमंत्री करा, त्यानंतर अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा मराठा आरक्षणाचा विषय सुटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री केल्यावर त्यांच्याकडे फक्त मराठा आरक्षण हा विषय द्यावा. मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री करताना एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री राहणार आहे. ज्या प्रमाणे राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री केले, त्याप्रमाणे मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे असे दोन जण मुख्यमंत्री म्हणून राहणार आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील अनेक प्रश्न आहे. यामुळे मराठा आरक्षण सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असे म्हटले आहे. 

दरम्यान, राज्यातील सर्व पक्षांशी चर्चा करुन दुसरा मुख्यमंत्री नेमला पाहिजे. मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री करताना मराठा, धनगर, मुस्लिम आणि ओबीसी हे आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे काम दिले पाहिजे. मनोज जरांगे हे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे ऐकतात. त्यामुळे मुख्यमंत्री असताना त्यांना त्यांची चांगली मदत होणार आहे, असे निवेदन नंदकर यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. 

 

Web Title: make manoj jarange patil chief minister for one month and give maratha reservation issue demand from chhatrapati sambhaji nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.