पर्यटन करा, सोबत फोटो काढा..
By Admin | Published: August 5, 2014 12:50 AM2014-08-05T00:50:35+5:302014-08-05T00:50:35+5:30
हल्ली कॅमेरा आणि स्मार्ट फोन्समुळे हौशी छायाचित्रकारांची फौज वाढली आहे.
मुंबई : हल्ली कॅमेरा आणि स्मार्ट फोन्समुळे हौशी छायाचित्रकारांची फौज वाढली आहे. याच छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळावे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील पर्यटनाला सुद्धा चालना मिळावी, यासाठी महाराष्ट्र पर्यटन
विकास महामंडळ आणि पुणो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने संयुक्तरीत्या अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात पर्यटनस्थळांच्या संदर्भातील माहितीपट आणि लघुपट तयार करण्याची संधी मिळणार आहे.
पुणो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या एमटीडीसी-एसएफसी विभागातील या स्पर्धेत निवडक माहितीपट आणि लघुपट दाखवण्यात येतील. शिवाय, सवरेत्कृष्ट लघुपटांना पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. या लघुपटांची निवड करण्यामागे चित्रमय, कल्पनारम्य आणि सौंदर्यात्मक गुणवत्ता दाखवण्याची संधी देणो, हा उद्देश आहे. या स्पर्धेत सहभागी होणा:यांना महाराष्ट्राचा नैसर्गिक, पारंपरिक ठेवा आणि संस्कृती मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांत सादर करता येईल.
तेरावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2क्15 मध्ये आहे. त्यासाठी सहभागी होण्याची अनुमती असणो आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रिव्हू डीव्हीडीसह 15 नोव्हेंबर 2क्14 पूर्वी अर्ज करावा लागेल. विजेत्यांना विविध श्रेणींत नैसर्गिक ठेवा, मानवनिर्मित ठेवा आणि महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारा चित्रपट या विभागांत पारितोषिके देण्यात येतील. (प्रतिनिधी)
ही स्पर्धा म्हणजे तरुण चित्रपट निर्मात्यांसाठी अद्भुत आव्हान आहे. त्यांना महाराष्ट्राची संस्कृती कलात्मक चित्र आणि ध्वनीच्या माध्यमातून सादर करायची आहे. त्यामुळे थेट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून सा:या जगाला दर्शन होईल.
- डॉ. जब्बार पटेल, पुणो आंतरराष्ट्रीय चित्रपट फाउंडेशनचे अध्यक्ष, संचालक
महाराष्ट्रात पर्यटन झपाटय़ाने वाढत आहे. महाराष्ट्रातील उत्तमोत्तम पर्यटनस्थळांच्या संदर्भात देश आणि विदेशांतील संभाव्य बाजारपेठांत आम्ही माहिती पोहोचवत आहे. सध्या या नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचा यासाठी उत्तम व्यासपीठ म्हणून वापर करावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, जेणोकरून अनेक शब्दांपेक्षा काही सेकंद-मिनिटांच्या आधारे व्हिडीओ आणि चित्रे प्रभावी ठरतील.
- डॉ. जगदीश पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, व्यवस्थापकीय संचालक