गृहिणीला बंधक बनवून ऐवज लंपास
By Admin | Published: July 27, 2016 02:27 AM2016-07-27T02:27:23+5:302016-07-27T02:27:23+5:30
एका मध्यमवर्गिय गृहिणीला चाकूच्या धाकावर बंधक बनवून तिच्या घरातील रोख आणि दागिन्यांसह अडीच लाखांचा मुद्देमाल लुटारूंनी लंपास केला. सोमवारी रात्री हुडकेश्वरमधील दुबेनगरात
हुडकेश्वरमधील घटना : परिसरात दहशत
नागपूर : एका मध्यमवर्गिय गृहिणीला चाकूच्या धाकावर बंधक बनवून तिच्या घरातील रोख आणि दागिन्यांसह अडीच लाखांचा मुद्देमाल लुटारूंनी लंपास केला. सोमवारी रात्री हुडकेश्वरमधील दुबेनगरात ही घटना घडली. सोमवारी रात्री ७.३० वाजता शोभाताई गुमगावकर यांच्या दारावर दोघांनी थाप दिली. दार उघडताच दोन तरुण आत आले. तुमच्या मुलाचे राहूलचे आम्ही मित्र आहोत असे सांगून आरोपींनी संधी साधून आतून दार बंद केले. त्यानंतर चाकूच्या धाकावर त्यांना हातपाय बांधून शयनकक्षात बंद करण्यात आले. नंतर आरोपींनी घरात अक्षरश: हैदोस घातला आणि रोख तसेच दागिन्यांसह २ लाख, ३७ हजारांचा ऐवज लंपास केला. पीडित शोभातार्इंनी खिडकीजवळ येऊन आरडओरड केल्याने शेजारी धावले. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. हुडकेश्वर ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली. एकूणच घटनाक्रम लक्षात घेता आरोपी गुमगावकर परिवाराच्या परिचयातील असावे, असा संशय आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.