"जिवंत राहिले तर...!"; सुजलेल्या चेहऱ्यासह फोटो शेअर करत साध्वी प्रज्ञा सिंह यांचा काँग्रेसवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 04:09 PM2024-11-07T16:09:46+5:302024-11-07T16:10:24+5:30
भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट करत काँग्रेसला घेरले आहे. तसेच, आपण जिवंत राहिलो तर नक्कीच न्यायालयात जाणार, असे म्हटले आहे.
'X'वरील पोस्टमध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे की, "काँग्रेसचे टॉर्चर केवळ एटीएस कोठडीपर्यंतच नाही, तर माझ्या आयुष्यभरासाठी मृत्यू दायक कष्टाचे कारण बनले आहे. मेंदूला सूज, डोळ्यांनी कमी दिसणे, कमी ऐकू येणे, बोलण्यात असंतुलन, स्टेरॉईड्स आणि न्यूरोच्या औषधांमुळे संपूर्ण शरीरावर सूज, एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिवंत राहिले तर नक्कीच न्यायालयात जाईन."
#कांग्रेस_का_टॉर्चर सिर्फ ATS कस्टडी तक ही नहीं मेरेजीवन भर के लिए मृत्यु दाई कष्ट का कारण हो गएl ब्रेन में सूजन,आँखों से कम दिखना,कानो से कम सुनना बोलने में असंतुलन स्टेरॉयड और न्यूरो की दवाओंसे पूरे शरीर में सूजन एक हॉस्पिटल में उपचार चल रहा हैl जिंदा रही तो कोर्ट अवश्य जाउंगीl pic.twitter.com/vGzNWn6SzX
— Sadhvi Pragya Singh Thakur (@sadhvipragyag) November 6, 2024
प्रज्ञा सिंहांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट -
मुंबईच्या एनआयए न्यायालयाने 2008 च्या मालेगांव ब्लास्ट प्रकरणात प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या विरोधात कारवाईमध्ये सहभागी न झाल्याबद्दल जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाचे न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी म्हटले आहे की. या खटल्यात अंतिम युक्तीवात बाकी असून यात प्रज्ञा सिंह ठाकुर यांची उपस्थिती आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या विरोधात 10 हजार रुपयांचे जमानती वारंट जारी रकण्यात आले आहे. हे वॉरंट 13 नोव्हेंबरपर्यंत परत केले जाऊ शखते. यासाठी, प्रज्ञा सिंह ठाकुर यांना न्यायालयात यावे लागेल आणि ते रद्द करावे लागेस.
मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात प्रज्ञासिंह ठाकूर यांना वॉरंट बजावण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी मार्चमध्येही एनआय कोर्टाने त्याना अटक वॉरंट जारी केले होते. वैद्यकीय कारणास्तव त्या गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयात हजर झालेल्या नाहीत.