मालेगाव स्फोट; आठ आरोपमुक्त

By admin | Published: April 26, 2016 06:30 AM2016-04-26T06:30:23+5:302016-04-26T06:30:23+5:30

मालेगाव २००६ मध्ये बॉम्बस्फोट केल्याचा आरोप असलेल्या आठ जणांना विशेष मोक्का न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी आरोपमुक्त केले.

Malegaon blast; Eight charge free | मालेगाव स्फोट; आठ आरोपमुक्त

मालेगाव स्फोट; आठ आरोपमुक्त

Next

मुंबई : मालेगाव २००६ मध्ये बॉम्बस्फोट केल्याचा आरोप असलेल्या आठ जणांना विशेष मोक्का न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी आरोपमुक्त केले. विशेष न्यायालयाच्या या निर्णयामुळे दहशतवाद प्रतिबंधक पथक (एटीएस) व सीबीआयला मोठा दणका बसला आहे. या स्फोटात
३७ जण ठार, तर १०० हून अधिक जखमी झाले होते.
मालेगावात २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील नऊ आरोपींनी स्वामी असीमानंद यांनी राष्ट्रीय तपास पथकाकडे दिलेल्या कबुलीजबाबानंतर विशेष मोक्का न्यायालयात आरोप मुक्ततेसाठी अर्ज केला. स्वामी असीमानंद यांच्या कबुलीजबाबानुसार, मालेगाव
२००६ चा बॉम्बस्फोट कट्टर उजव्या विचारसरणीची संघटना ‘अभिनव भारत’ने घडवून आणला. एनआयएनेही मालेगाव २००६ व २००८ च्या बॉम्बस्फोटासाठी ‘अभिनव भारत’ला जबाबदार धरले आहे.
पाच वर्षांच्या कारावासानंतर या सर्व आरोपींनी आरोपमुक्ततेसाठी न्यायालयात अर्ज केला. तसेच २०११ मध्ये जामिनासाठी अर्जही केला. त्यांच्या जामीन अर्जावर एनआयएने आक्षेप घेतला नाही. त्यामुळे या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली. सोमावरी विशेष मोक्का न्यायालयाचे न्या. व्ही. व्ही. पाटील यांनी या सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली. नऊपैकी सहा आरोपी कायमचे कारागृहाबाहेर आले. तर दोन आरोपींना मुंबईच्या लोकल बॉम्बस्फोटप्रकरणी
शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर
एकाचा खटल्यादरम्यानच मृत्यू झाला आहे.
नुरुल हुडा समसुदोहा, रईस अहमद रज्जब अली, सलमान फर्सी, फारोघ इक्बाल मगदुमी, शेख मोहम्मद अली अलाम शेख, असीफ खान बशीर खान, अब्रार अहमद गुलाम अहमद, मोहम्मद झहीद अब्दुल माजीद अशी या आठ जणांची नावे असून, शब्बीर अहमद मशीउल्ला याचा खटल्यादरम्यानच मृत्यू झाला आहे.
हे सर्व बंदी घातलेल्या सिमीचे सदस्य आहेत आणि त्यांनी बॉम्बस्फोटासाठी पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर - ए - तोयबाची मदत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
- आणखी वृत्त/१२
>प्रकरण काय ?
८ सप्टेंबर २००६ रोजी या नऊ जणांनी कट रचत नाशिकमधील मालेगावसारख्या संवेदनशील भागात तीन बॉम्बस्फोट केले. गर्दी असलेला बाजार, दफनभूमी आणि शब्बे- बरातच्यावेळी मशिदीमध्ये बॉम्बस्फोट केला. या बॉम्बस्फोटांत ३७ जणांचा मृत्यू झाला, तर १०० लोक जखमी झाली.
हे होते आरोप : आयपीसी कलम ३२४, ३२५, ३२६, १२१ (ए) आणि १२० (बी) तर आरोपींवर एक्सप्लोसिव्ह सबस्टन्स अ‍ॅक्ट कलम ४, ५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. त्याशिवाय मोक्का व बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्याअंतर्गतही गुन्हा नोंदवला होता.

Web Title: Malegaon blast; Eight charge free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.