मालेगाव बॉम्बस्फोट, साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितवरील मोक्काचे आरोप हटवले

By admin | Published: May 13, 2016 02:03 PM2016-05-13T14:03:26+5:302016-05-13T16:06:29+5:30

मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) आरोपपत्र दाख केले असून त्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह हिच्यावरील आरोप हटवण्यात आले आहेत.

Malegaon blast, Sadhvi Pradnya, Colonel Purohit removed the allegations | मालेगाव बॉम्बस्फोट, साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितवरील मोक्काचे आरोप हटवले

मालेगाव बॉम्बस्फोट, साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितवरील मोक्काचे आरोप हटवले

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ -  मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी मुंबईतील न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यावरील मोक्कातंर्गत आरोप हटवले आहेत. यामुळे प्रज्ञा सिंहला मोठा दिलासा मिळाला असून, तिची तुरुंगातून लवकर सुटका होऊ शकते. 
 
स्फोटातील प्रज्ञाचा सहभाग स्पष्ट करणारे ठोस पुरावे मिळाले नसल्याचे एनआयएने मागच्या महिन्यात म्हटले होते. २९ सप्टेंबर २००८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी एनआयएने एकूण १४ जणांना आरोपी बनवले होते. यात कर्नल श्रीकांत पुरोहितचाही समावेश होता. 
 
दुचाकीवरील दोन बॉम्बच्या स्फोटात सात जण ठार झाले होते. महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला तपास झाला होता. नंतर हा तपास एनआयएकडे देण्यात आला. पुरोहित आणि प्रज्ञा ठाकूरशिवाय शिवनारायण कालसांगरा, श्याम साहू, रमेश उपाध्याय, समीर  कुलकर्णी, अजय, राकेश धावडे, जगदीश म्हात्रे, सुधाकर व्दिवेदी, सुधाकर चर्तेुवेदी आणि प्रविण तकालकी यांनाही अटक झाली होती. 
 
 यापूर्वीच एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहीत यांच्यावर लावण्यात आलेला मोक्का हटवण्यासंदर्भात कायदा मंत्रालय आणि अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून मत मागितले होते. केंद्रात सत्ता पालट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींबाबतची भूमिका सौम्य झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. 
मालेगाव स्फोटाप्रकरणी अटकेत असलेल्या कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्त्यांबद्दल मवाळ धोरण स्वीकारा असा संदेश आपल्याला एनआयएच्या अधिका-याने दिला होता, असा गौप्यस्फोट  याप्रकरणातील विशेष सरकारी वकिल रोहिणी सलियन यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. केंद्रात मोदींचं सरकार आल्यानंतरच हा बदल झाल्याचेही त्यांनी म्हटले होते.
कधी झाले होते स्फोट?
२९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या मालेगाव स्फोटात ४ जण ठार, ७९ जण जखमी झाले होते. या स्फोटामागे कडव्या हिंदुत्ववादी संघटनाचा हात असल्याचं तपासात पुढे आलं. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली होती. 

Web Title: Malegaon blast, Sadhvi Pradnya, Colonel Purohit removed the allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.