मालेगावात स्वदेशी सुरक्षा जागरण रॅली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 03:38 PM2017-08-06T15:38:21+5:302017-08-06T15:38:26+5:30

स्वदेशी जागरण मंच मालेगाव तर्फे मालेगाव शहरात रविवार ६ ऑगष्ट रोजी सकाळी १0 वाजता भव्य पायदळ रॅली काढण्यात आली.

Malegaon indigenous security Jagaran Rally! | मालेगावात स्वदेशी सुरक्षा जागरण रॅली !

मालेगावात स्वदेशी सुरक्षा जागरण रॅली !

Next

मालेगाव, दि. 6 - स्वदेशी जागरण मंच मालेगाव तर्फे मालेगाव शहरात रविवार ६ ऑगष्ट रोजी सकाळी १0 वाजता भव्य पायदळ रॅली काढण्यात आली.
 आपल्या देशात चिनी वस्तू खुप मोठय़ा प्रमाणात विकल्या जात असल्यामुळे चिनची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे. त्यामुळे चिनची मुजोरी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे, असा आरोप करीत ही रॅली काढव्यात आली.  चिनी बनावटीच्या वस्तूंचा व्यापार मोठय़ा प्रमाणात आहे. 
देशाच्या आर्थिक उलाढालीत स्वदेशी वस्तुंच्या विक्रीबाबतची टक्केवारी घसरती आहे. आज भारतीय बाजारपेठेत जवेढय़ा पण चिनी वस्तू आहेत तेवढय़ा जर आपण खरेदी केल्या नाहीत तर चीनची अर्थव्यवस्था काही अंशी कमजोर होईल याबाबत जनजागृती केली.  
भारतीय बाजारपेठेत आलेल्या चीनी वस्तुची खरेदी न करण्याचे आवाहन स्वदेशी सुरक्षा जागरण मंच मालेगावच्या वतिने करण्यात आले. 
 रविवार ६ आगष्ट रोजी दु. १२ वाजता पायदळ रॅलीचे आयोजन केले होते. सदर रॅली ही श्री राम मंदिर शिव चौक येथे एकत्रीत होवून जोगदंड हॉस्पिटल, अग्निहोत्री दुकान गल्ली, मेडिकल चौक, डॉ भांगडिया हॉस्पिटल, जिनशक्ती हार्डवेअर पासुन अग्रवाल क्लॉथ स्टोअर्स समोरुन परत श्री राम मंदिरजवळ पयदल रॅलीची सांगता करण्यात आली आहे. त्यावेळी शंकरराव ढोबळे, अतुल बळी, मोहन बळी, दीपक राउत , योगेश मुंढरे , सागर राउत, अनिकेत अग्रवाल , सचिन पांडे, नीलेश मालपानी, अरुण बळी, राहुल चव्हाण, संतोष बळी, सावकार, नदकिशोर वनस्कार, विनोद  ऊँडाळ, दीपक मुठळ, सुनील नखाते, संदिप दशपुते, प्रशांत बोरकर, अमोल निमकर, अनत जहगिर्दार, सचिन बांडे, शिवजी घुगे , प्रवीण बोबड़े , दीपक आसरकर , किशोर महाकाळ, सागर आहिर ,अभी देवकते , शाम काटेकर, राम आढव , कुणाल मापारी, गणेश दंडगे, पवन बळी यांच्या सह मालेगांव येथील शेकडो कार्यकर्ते  व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पोलिस प्रशासनातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: Malegaon indigenous security Jagaran Rally!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.