डाळ घोटाळ्याची चौकशी करा मलिक यांची मागणी
By admin | Published: November 27, 2015 02:54 AM2015-11-27T02:54:47+5:302015-11-27T02:54:47+5:30
राज्यात झालेल्या डाळ घोटाळ्याची सरकारने कमिशन आॅफ इन्क्वॉयरी अॅक्टखाली विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी,
मुंबई : राज्यात झालेल्या डाळ घोटाळ्याची सरकारने कमिशन आॅफ इन्क्वॉयरी अॅक्टखाली विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
डाळीवरील निर्बंध हटविण्याची कारणे काय, कोणाच्या सांगण्यावरून हे निर्बंध हटविण्यात आले, असा सवाल मलिक यांनी केला. ते म्हणाले, डाळींवरील निर्बंध हटविण्यात आल्यानंतर वाढलेले डाळीचे भाव, केंद्र सरकार कडून वारंवार निर्देश दिल्यानंतरदेखील ६ महिने सरकार गप्प
राहिले. त्यानंतर जप्त साठ्यांची विल्हेवाट लावत असताना
घेतलेल्या निर्णयामुळे या राज्यात हजारो कोटींचा डाळ घोटाळा
झाला आहे, असा आरोपही
त्यांनी केला.
डाळीवरील निर्बंध हटविण्याची मागणी कोणत्याही संघटनेने
अथवा व्यक्तीने केलेली नसताना डाळीवरील निर्बंध कसे हटविले
गेले याचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल, असेही मलिक म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)