अखेर माळीणला मिळाले साडेपाच कोटी!

By Admin | Published: January 9, 2015 02:22 AM2015-01-09T02:22:53+5:302015-01-09T02:22:53+5:30

दोन खात्यांच्या वादात दुर्घटनाग्रस्त माळीण गावाचे पुनर्वसन अडले असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच राज्य सरकार खडबडून जागे झाले.

Malin was finally paid 2.5 million! | अखेर माळीणला मिळाले साडेपाच कोटी!

अखेर माळीणला मिळाले साडेपाच कोटी!

googlenewsNext

मुंबई : दोन खात्यांच्या वादात दुर्घटनाग्रस्त माळीण गावाचे पुनर्वसन अडले असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच राज्य सरकार खडबडून जागे झाले.
मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून त्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना तत्काळ ५ कोटी ५५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी जारी केली. तसेच माळीण गावाचे पुनर्वसन आता मदत व पुनर्वसन विभागामार्फत निर्णयदेखील घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५.५५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे आजच सुपूर्द करण्यात आले. या रकमेसह आतापर्यंत मृतांच्या वारसांना ७ कोटी ५५ लाख रुपये देण्यात आले आहे. या दुर्घटनेत १५१ जण मृत्युमुखी पडले होते. मृत व्यक्तीच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचे शासनाने जाहीर केले होते. १ आॅगस्ट २०१४ रोजी २ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यानंतर मदत देण्यात आलेली नव्हती. उर्वरित अर्थसहाय्य आज देण्यात आले.
पुनर्वसनाचे काम आदिवासी विकास विभागाऐवजी आता मदत व पुनर्वसन विभागातर्फे करण्यात येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)

आदिवासी विकास आणि मदत
व पुनर्वसन या दोन विभागांच्या वादात माळीणचे पुनर्वसन रखडले, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात तत्काळ निर्णय घेऊन मदतीचा प्रश्न मार्गी लावला.

Web Title: Malin was finally paid 2.5 million!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.