पावसाळ्यापूर्वी माळीणकरांना मिळणार घर

By Admin | Published: May 11, 2016 12:58 AM2016-05-11T00:58:31+5:302016-05-11T00:58:31+5:30

माळीण दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम सुरू झाले आहे. घरबांधकामे सुरू करण्यात आली असून पावसाळ््यापूर्वी ६७ पैकी निम्मी घरे पूर्ण करण्यात येणार आहेत.

Malinkar will get home before rainy season | पावसाळ्यापूर्वी माळीणकरांना मिळणार घर

पावसाळ्यापूर्वी माळीणकरांना मिळणार घर

googlenewsNext

घोडेगाव : माळीण दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम सुरू झाले आहे. घरबांधकामे सुरू करण्यात आली असून पावसाळ््यापूर्वी ६७ पैकी निम्मी घरे पूर्ण करण्यात येणार आहेत. दिवाळीपर्र्यंत घरे, मूलभूत सोई-सुविधा अशी सर्व कामे पूर्ण करून घरे ताब्यात देण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
माळीण ग्रामस्थांसाठी सुरू असलेल्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केली. या वेळी प्रांताधिकारी कल्याणराव पांढरे, कार्यकारी अभियंता एस. बी. देवढे, जे. आर. विभूते, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. कुलकर्णी, वास्तुविशारद योगेश राठी, प्रकल्पाधिकारी चेतना मोरे, तहसीलदार बी. जे. गोरे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, पंचायत समितीचे उपसभापती सुभाष तळपे, सदस्य संजय गवारी, सरपंच दिगंबर भालचिम आदी उपस्थित होते.
राव म्हणाले, ‘‘सध्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्राथमिक सोई-सुविधा पुरविणे, प्लॉट तयार करणे, बसस्थानक बांधणे, गटार बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, रस्ते तयार करणे, जलनिस्सारण, स्मृतिवन ही कामे सुरू आहेत. जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, समाजमंदिर, पशुवैद्यकीय दवाखान्यात, पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण व भूमिगत गटारे ही ८ कामे सुरू आहेत. यापैकी काही कामे जवळपास संपत आली आहेत. मोठी कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण केली जातील. कामांच्या गुणवत्तेवर लक्ष देण्यात येत आहे. यासाठी ‘थर्ड पार्टीद्वारे कामाचे आॅडिट केले जात आहे. काम सुरू असताना कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमार्फत कामाची दक्षता व गुणनियंत्रण ठेवली जात आहे.
पावसाळ््यापर्यंत जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अजून एक महिन्यानंतर पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी निम्म्या घरांची कामे पूर्ण करणार व पावसाळा संपल्याबरोबर उर्वरित काम पूर्ण केले जाईल. घरे पूर्ण झाल्यानंतरच घरे ताब्यात दिली जाणार आहेत. कारण घरांबरोबरच बाकीची कामेदेखील पूर्ण होणे आवश्यक आहे. (वार्ताहर)पावसाळ््यानंतर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. रस्त्याच्या कडेला, मोकळ््या जागेत, स्मृतिवनाच्याभोवती वृक्षलागवड केली जाणार आहे. तसेच नवीन वसाहतीच्या मागे असलेल्या डोंगरावर मातीला थांबून ठेवण्यासाठी बांबूची व घायपात लागवड केली जाणार आहे. माळीणला पाण्यासाठी विहीर घेण्यात आली.
दोन ठिकाणी बोअर घेण्यात आले, मात्र तीनही ठिकाणी पाणी लागले नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात जुन्या स्रोतातून पाण्याचा उपसा केला जाणार आहे, त्याचबरोबर स्थानिक स्तरावर विभागामार्फत सुरू असलेल्या पायलडोह बंधाऱ्याचे काम अपूर्ण आहे. हे काम दीड ते दोन महिन्यांत पूर्ण करून यातून वर्षभर पाणी मिळविणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे.या वेळी ग्रामस्थांनी पाणी नसल्याबाबत तक्रार करीत धरणातून पाइपलाइन टाकून पाणी द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. भविष्यात धरणातून पाइपलाइन टाकण्याची परवानगी जलसंपदा विभागाकडे मागितली जाईल. पायलडोह काम दोन महिन्यांत पूर्ण करून याचा स्रोत माळीणसाठी पाणीपुरवठ्याला वापरला जाईल, असे या वेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Web Title: Malinkar will get home before rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.