मलकापूरमध्ये शेतीच्या वादातून पुतण्याने काकाचा खून केल्याचा संशय
By Admin | Published: April 25, 2016 11:00 AM2016-04-25T11:00:31+5:302016-04-25T11:01:07+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापुर तालुक्यातील दुधलगाव येथील बाळकृष्ण निवृत्ती पाटील यांचा शेतातील गोठ्यात निर्घृण खून करण्यात आला
>ऑनलाइन लोकमत
मलकापूर, दि. २५ - बुलडाणा जिल्ह्यातील मलकापुर तालुक्यातील दुधलगाव येथील बाळकृष्ण निवृत्ती पाटील (वय 62) यांचा शेतातील गोठ्यात निर्घृण खून करण्यात आला. २४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून शेतीच्या जुन्या वादातूव पाटील यांच्या पुतण्यानेच त्यांचा खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण पाटील हे नेहमीप्रमाणे रात्री गावाच्याजवळच असलेल्या शेतात झोपण्यासाठी गेले होते. सोमवारी सकाळी त्यांचा मुलगा गजानन बाळकृष्ण पाटील हा गुरांचे शेणपाणी व दुध काढण्यासाठी गेला असता त्याला आपले वडील शेतातील गोठ्यात असलेल्या खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले असता त्याने पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्यांच्या तोंडातून व डोक्यातून रक्तस्राव झाल्याचे दिसल्याने त्यांनी खुन झाल्याचा संशय व्यक्त करीत घटनेची माहिती मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन ला दिली.
बाळकृष्ण पाटील यांचे त्यांचा पुतण्या संदीप दत्तात्रय पाटील (वय 27)सोबत जुन्या घरगुती वादातून कडाक्याचे भांडण झाले होते. या खूनाच्या घटनेनंतर संदिप पाटील हा गावातून फरार झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर खूनाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.