Sanjay Raut | "काँग्रेसच्या गळ्यात जरूर पडा पण त्यासाठी..."; भाजपाचा संजय राऊतांना खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 10:36 AM2023-04-29T10:36:34+5:302023-04-29T10:37:30+5:30

मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीका झाली 

Mallikarjun Kharge controversy PM Modi snake statement BJP Keshav Upadhye slams Sanjay Raut | Sanjay Raut | "काँग्रेसच्या गळ्यात जरूर पडा पण त्यासाठी..."; भाजपाचा संजय राऊतांना खोचक सल्ला

Sanjay Raut | "काँग्रेसच्या गळ्यात जरूर पडा पण त्यासाठी..."; भाजपाचा संजय राऊतांना खोचक सल्ला

googlenewsNext

Sanjay Raut, BJP vs Congress: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची तुलना सापाशी केली. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरले. (Mallikarjun Kharge snake controversy) त्यानंतर या वादात ठाकरे गटानेही उडी घेतली. साप हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे. साप हा शेतीचा राखणदार आहे. तसेच भगवान शंकराच्या गळ्यातही सापच आहे. भाजपचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शंकराचा अवतार मानतात. मग सापाचा एवढा तिटकारा का? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुंगी वाजवतात आणि अंधभक्त त्यावर डोलतात, अशी खोचक टीकाही दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आली. त्यावर आता भाजपाने पलटवार केला आहे.

"संजय राऊत महाराष्ट्रात सापाच्या पिल्लाला 30 वर्षं दूध पाजलं म्हणता, विषारी म्हणता, भाजपाच्या जीवावर मोठे झालात. मोदींजीच्या नावाने मत मागताना हे आठवलं नाही का ? मोदींजीच्या नावाने मतं मागितली आणि निवडून आल्यावर पाठीत खंजीर खुपसला यालाच दंश करणे दुष्टपणा करणे असे म्हणतात. भाजपा आणि मोदींना जनतेने लोकशाही पद्धतीने निवडून दिलं आहे. काँग्रेसच्या गळ्यात जरूर पडा पण ते पडण्यासाठी कोणत्याही गोष्टीचे समर्थन करू नका, काँग्रेस अध्यक्षांनी माफी मागितली आहे, तुम्ही तेवढे संवेदनशील नाहीत याची जाणीव आहे," अशा शब्दांत भाजपाचे केशव उपाध्ये यांनी संजय राऊंतावर टीका केली आणि त्यांना खडा सवाल केला.

सामना अग्रलेखात नक्की काय?

"शंकराने विष पचवले म्हणून तो निळकंठ झाला. काही लोकांना पंतप्रधान मोदी हे विष्णू आणि शंकराचे आवतार वाटतात. मग साप गळ्यात घालून विष पचवणाऱ्या शंकराशी तुलना होताच राजकीय तांडव करण्याची गरज काय? भाजपच्या जिभांतील विषामुळे आपल्या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य गतप्राण झाले आहे. न्यायालये, संसद आणि सर्व घटनात्मक संस्थांना सापांचा विळखा पडला आहे. लोकशाहीच्या नावाने मोदी रोज पुंगी वाजवतात. त्यावर अंधभक्त डोलतात. जे डोलत नाहीत त्यांना देशद्रोही ठरवून छळले जातात," असा शाब्दिक हल्ला ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला.

Web Title: Mallikarjun Kharge controversy PM Modi snake statement BJP Keshav Upadhye slams Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.